Russia-Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या अण्वस्त्र संरक्षण दलाच्या प्रमुखाची हत्या !

जनरल इगोर किरिलोव्ह

मॉस्को (रशिया) – येथे युक्रेनने घडवून आणलेल्या स्फोटात रशियाच्या अण्वस्त्र संरक्षण दलाचे प्रमुख जनरल इगोर किरिलोव्ह आणि त्यांचे एक सहकारी ठार झाले आहेत. किरिलोव्ह हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे जवळचे सहकारी होते.

किरिलोव्ह यांंच्या घराबाहेर त्यांच्या स्कूटरमध्ये स्फोटके ठेवून स्फोट घडवून  ्रेआणण्यात आला. त्यांच्या हत्येचे दायित्व युक्रेनने घेतले आहे. युक्रेनच्या ‘सुरक्षा सेवा’ विभागाने सांगितले की, एका विशेष कारवाईत किरिलोव्ह मारले गेले. किरिलोव्ह  यांनी सातत्याने रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचे समर्थन केले होते, तसेच अमेरिका युक्रेनमध्ये जैविक शस्त्रास्त्रे बनवण्याची प्रयोगशाळा उभारत आहे, असा आरोप केला होता.