वृषभरूपातील नंदी हे शिवाचे वाहन असून त्याला शिवपरिवारात महत्त्वाचे स्थान दिले आहे. शिवाचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेतले जाते.

१, नंदीची वैशिष्ट्ये
अ.‘सायणाचार्यांनी वृषभ या शब्दाचे व्युत्पादन वृष् धातूपासून केले असून त्याचा अर्थ वर्षिता (वर्षाव करणारा) असा दिला आहे. वृष् धातूपासून बनलेल्या वृषभ या शब्दाचा दुसरा अर्थ अत्यधिक प्रजननशक्तीने युक्त असा आहे.’ म्हणूनच नंदी हा विकसित पौरुषाचे लक्षण मानला गेला आहे.
आ. ज्याप्रमाणे धर्मशास्त्राचा प्रणेता मनु आणि अर्थशास्त्राचा बृहस्पति आहे, त्याप्रमाणे कामशास्त्राचा प्रणेता नंदी आहे.
२. नंदीच्या मूर्तीचा भावार्थ
अ. नंदीचे पुढचे दोन पाय म्हणजे सत्य आणि तप. नंदीचे मागील दोन पाय म्हणजे दया आणि दान.
आ. नंदी तीन पाय दुमडलेला आणि एक पाय उभा असलेला असा असतो. कलियुगात धर्म एक चतुर्थांश राहिला असल्याचे ते द्योतक आहे.
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
जपमाळ
संपादकीय : मेकॉले यशस्वी झाला !
ईश्वरप्राप्तीसाठी साधना प्रथम आणि नंतर तात्त्विक माहितीचे वाचन
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !