मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनाच्या निमित्ताने परळ येथील हिंदू महासभेची शाखा आणि हिंदूसभा यांच्या वतीने सावरकरप्रेमींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. २६ फेब्रुवारी या दिवशी दादर (पश्चिम) येथील पाटील मारुति मंदिर सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हा मेळावा घेतला जाणार आहे. यामध्ये ‘धर्मांतर : सद्य:स्थितीतील कारणे आणि उपाय’ या विषयावर प्रसिद्ध लेखक श्री. समीर दरेकर यांचे व्याख्यान आहे. ‘या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे’, असे आवाहन हिंदू महासभेचे परळ शाखेचे अध्यक्ष श्री. दिनेश भोगले यांनी केले आहे.