अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी प्रवास करणार्‍या साधकांची आपल्या परिचितांकडे निवास आणि भोजन व्यवस्था होऊ शकल्यास त्याची माहिती कळवा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातन संस्थेचे पूर्णवेळ साधक अध्यात्मप्रसार आणि हिंदु राष्ट्र जागृतीचे कार्यक्रम यांसाठी भारतातील विविध राज्यांमध्ये प्रवास करत असतात. या प्रवासाच्या वेळी विविध राज्यांत अध्यात्मप्रेमी, जिज्ञासू आणि हिंदु राष्ट्रप्रेमी यांना संपर्क करणे; व्याख्याने, बैठका, सभा, शिबिरे आदींचे आयोजन करणे आदी उपक्रम राबवण्यात येतात.

भारतातील बहुतांश जिल्हे आणि राज्ये यांमध्ये सनातनचे अद्याप कार्य नसल्याने त्या ठिकाणी पूर्णवेळ साधकांची निवास अन् भोजन व्यवस्था करण्यास मर्यादा येतात. या दृष्टीने सर्वत्रचे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी आपले परिचित, नातेवाईक अथवा आपल्या संपर्कातील हिंदुत्वनिष्ठ यांची अशा प्रकारची व्यवस्था करण्याची सिद्धता असल्यास त्यांची पुढील प्रकारची माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांना कळवावी. आपण ही माहिती ५ मार्च २०२२ या दिवसापर्यंत कळवल्यास पूर्णवेळ साधकांची सोय करता येईल. (सनातनच्या साधकांनी प्रस्तुत माहिती जिल्हासेवकांना कळवावी. जिल्हासेवकांना या संदर्भात गूगलफॉर्म पाठवण्यात येईल. त्यांनी तो भरून पाठवावा.)

१. परिचिताचे नाव, पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक

२. परिचिताविषयी संक्षिप्त माहिती (अध्यात्म / हिंदुत्वाची आवड, शिक्षण, व्यवसाय, अन्य ..)

३. नाव पाठवणार्‍याचे नाव अन् संपर्क क्रमांक, परिचिताशी असलेले नाते

४. निवास, भोजन, वाहन आदींपैकी कुठल्या व्यवस्था करू शकतात ?

५. व्यवस्था किती दिवस आणि किती जणांची करू शकतात ?

या माध्यमांतून आपले परिचित, नातेवाईक अथवा हिंदुत्वनिष्ठ यांनाही अध्यात्मप्रसार आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य यांच्याशी जोडता येईल.

प्राधान्याने पुढील राज्ये / जिल्हे यांची माहिती मिळाल्यास त्यानुसार पूर्णवेळ साधकांच्या प्रवासाचे नियोजन प्राधान्याने करता येईल.