कॅनडाच्या संसदेमध्ये खलिस्तानवादी शीख नेत्याच्या समर्थकांकडून सरसकट सर्व स्वस्तिकांवर बंदी घालणारे विधेयक सादर

कॅनडातील आंदोलनामध्ये नाझीचे स्वस्तिक असणार्‍या झेंड्याचा वापर केल्याचा परिणाम

अमेरिकेतील हिंदु संघटनेकडून हिंदूंच्या स्वस्तिकवर बंदी न घालण्याची मागणी

खलिस्तानवाद्यांना अशा प्रकरणामुळे हिंदूद्वेषाचे निमित्तच मिळाले आहे, हेच यातून लक्षात येते !

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस बंधनकारक करण्याच्या विरोधात ट्रकचालक आणि जनतेकडून आंदोलन करण्यात येत असल्याने तेथे आता आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या काळात काही जणांकडून नाझीच्या स्वस्तिक चिन्ह असलेल्या झेंड्याचा वापर करण्यात येत आहे. यामुळे कॅनडा सरकारने सरसकट सर्व स्वस्तिकांवर बंदी घालण्यासाठी संसदेत विधेयक सादर केले आहे.

जगमीत सिंह खलिस्तान आणि पाकिस्तान यांचे कट्टर समर्थक

‘न्यू डेमॉक्रेटिक पार्टी’चे नेते जगमीत सिंह यांच्या समर्थनातील सदस्यांनी हे विधेयक मांडले. याला कॅनडातील हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे.

जगमीत सिंह हे खलिस्तान आणि पाकिस्तान यांचे कट्टर समर्थक आहेत.

अमेरिकेतील एका प्रमुख हिंदु संघटनेने कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो आणि विधेयकाचे समर्थन करणारे मूळ भारतीय वंशाचे नेते जगमीत सिंह यांच्याकडे बंदी न आणण्याची मागणी केली आहे. हिंदु संघटनेने म्हटले आहे की, नाझीचे स्वस्तिक आणि हिंदु धर्मातील प्राचीन अन् शुभ मानले जाणारे स्वस्तिक यांत भेद आहे.