‘२२.३.२०२० या दिवशी रात्री ९ वाजता मी नामजप करण्यासाठी ध्यानमंदिरात गेले होते. तेव्हा रात्री ९.१५ ते ९.२० वाजण्याच्या दरम्यान ‘उभे राहून देहाभोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण काढूया’, असा विचार माझ्या मनात आला. मी ध्यानमंदिराच्या दरवाजाजवळील भागाकडे उभे राहिले आणि देहावरील आवरण काढणार, इतक्यात तेथे जवळच मला रक्ताचा डाग पडला असल्याचे दिसले. मी रक्ताचा डाग एका साधिकेला दाखवला.
त्या रक्ताच्या डागाकडे पाहिल्यावर मला तो डाग त्रासदायक असल्याचे जाणवले; कारण स्थुलातून काहीही कारण नसतांना अकस्मात् रक्ताचा डाग पडला होता आणि हा डाग पूर्णपणे कोरडा होता. त्यानंतर रात्री ९.३० वाजता ध्यानाची वेळ असल्याने ध्यान झाल्यानंतर मी साधकांना याविषयी सांगितले.’
– सौ. मनीषा दीपक परब, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.३.२०२०)