राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ०६.२.२०२२

  • खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

  • राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.

भारताला राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील संत संमेलनामध्ये शेकडो संतांकडून प्रस्ताव संमत !

प्रयागराज येथील संत संमेलन

‘प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ब्रह्मर्षि आश्रमामध्ये माघ मेळ्यानिमित्त आयोजित संत संमेलनामध्ये शेकडोंच्या संख्येने साधू-संत सहभागी झाले होते. या वेळी संतांनी ‘राज्यघटनेत पालट करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात यावे, असा प्रस्ताव संमत केला.

संतांनी संमेलनात उपस्थित राहू नये, म्हणून प्रशासनाचे प्रयत्न !

संतांना विरोध करणारे प्रशासन भारतात असणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक

या वेळी काही संतांनी आरोप केला की, जिल्हा प्रशासनाने दूरभाष करून ‘संमेलनामध्ये जाऊ नये’, असे सांगितले. तसेच प्रशासनाकडून काही अडथळेही निर्माण करण्यात आले.

‘धर्मसंसद’ नावाने अनुमती देण्यास प्रशासनाच्या नकारामुळे ‘संत संमेलन’ असे नाव ठेवले !

‘धर्मसंसद’ हे नाव लावण्यास संत सोडून कोण लायक आहे ? – संपादक

या संमेलनाचे नाव ‘धर्मसंसद’ ठेवण्यात आले होते; मात्र प्रशासनाने या नावाला आक्षेप घेत अनुमती देण्यास नकार दिल्याने याचे नाव ‘संत संमेलन’ असे ठेवण्यात आले, असे संतांकडून सांगण्यात आले.’


पुणे येथे हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्या विवाहाचे ‘शिवविवाह’ म्हणून अश्लाघ्य उदात्तीकरण !

  • ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांत लक्षावधी हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले असतांना अशा विवाहांना ‘शिवविवाह’ म्हणणे, म्हणजे हिंदु भगिनींच्या शीलरक्षणासाठी ५ पातशाह्यांशी लढा उभारलेल्या छत्रपती शिवरायांचा अवमानच आहे !
  • मुसलमान मुलगी आणि हिंदु मुलगा असा शिवविवाह कधी लावण्यात आला आहे का ?
धर्माची बंधन झुगारत, रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत हिंदू-मुस्लीम विवाह सोहळा पार

‘पुणे येथे स्वाती शेळके या हिंदु मुलीचा अरिफ काझी या मुसलमान मुलाशी ‘शिवविवाह’ म्हणून विवाह लावून देण्यात आला. (संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवधर्म स्थापन केला आहे आणि त्यांनी ‘शिवविवाह’ ही पद्धत निर्माण केली आहे.) शिवविवाह हा हिंदु धर्मातील पारंपरिक विवाहाला फाटा देऊन भारतीय राज्यघटनेला साक्षी ठेवून केला जातो.’


‘लव्ह जिहाद’ला ‘शिवविवाह’ म्हणणे, हा छत्रपती शिवरायांचा अपमानच ! – हिंदु जनजागृती समिती

‘भारतीय कायद्यानुसार वयात आलेल्या युवक-युवतींनी स्वसंमतीने विवाह करणे, हे कायदेशीर आहे; मात्र त्याचा राजकीय दृष्टीने लाभ उठवण्याचा प्रयत्न करणे, हे पूर्णपणे अयोग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रचलित कथेनुसार कल्याणच्या सुभेदाराच्या मुसलमान सुनेचा आदर केला, तिचे धर्मांतर केले नाही; परंतु त्याच वेळी त्यांनी बजाजी निंबाळकर आदी बलपूर्वक मुसलमान बनवलेल्या हिंदूंना त्यांचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मात परत घेतले आणि त्यांच्याशी सोयरीक जोडली. आज ‘लव्ह जिहाद’चे भयंकर षड्यंत्र चालू असतांना त्यात अडकलेल्या हिंदु युवतींना पुढे बलपूर्वक इस्लाम ‘कबूल’ (मान्य) करण्यासाठी त्यांच्यावर अत्याचार करण्यात येतात. तसेच अनेक जणींची हत्याही केल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. उद्या या कुटुंबाला मुले झाल्यास ती ‘हिंदु’ असतील कि ‘मुसलमान’ ? अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता केवळ प्रसिद्धीसाठी या विवाहाला ‘शिवविवाह’ म्हणणे, हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे’, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.’