परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
‘साधनेमध्ये मनाच्या स्तरावर होणारी अयोग्य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्या अभावामुळे साधकाला स्वतःच्या चुका कळत नाहीत आणि त्या मनाच्या स्तरावरील चुका असल्यामुळे इतरांच्या लक्षात येत नाहीत. ही विचारप्रक्रिया अयोग्य कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. त्यामुळे या अयोग्य कृतीची जाणीव संबंधिताला करून दिल्यास त्याला त्याच्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव होण्यास साहाय्य होते, उदा. एका साधकाच्या मनातील दुसर्या साधकाविषयी असणारा पूर्वग्रह इतरांना लक्षात येणार नाही; परंतु एखाद्या प्रसंगात ‘एका साधकाला शक्य असूनही त्याने दुसर्या साधकाला साहाय्य केले नाही’, या अयोग्य कृतीची जाणीव साधकाला करून दिली, तर ‘मी पूर्वग्रहामुळे त्या साधकाला साहाय्य केले नाही’, हे त्याच्या लक्षात येऊ शकते. त्यामुळे साधनेत स्थुलातून होणार्या चुका संबंधिताला सांगणे, त्याच्या साधनेसाठी अतिशय महत्त्वाचे असते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१२.२०२१)