वर्धा येथे कार नदीत कोसळून भीषण अपघातात ७ विद्यार्थी ठार

भाजप आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचा समावेश !

वर्धा – येथे २४ जानेवारीच्या रात्री कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार अनुमाने पुलावरून ४० फूट खाली पडली. मृतांमध्ये भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा श्री. आविष्कार याचा समावेश आहे. हा भीषण अपघात सेलसुरा पुलावर रात्री १ वाजता झाला. विद्यार्थी ढाब्यावर जेवण करून घरी परतत असतांना अपघात झाला.