कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी !

तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या खासदारावर दगडफेक आणि वाहनाची तोडफोड

  • बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात नाही, हे गेली काही वर्षे दिसून येत असतांना त्याविषयी केंद्र सरकार काहीच करत नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
  • सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे गुंड कार्यकर्ते कधीतरी तेथील जनतेला कायद्याचे राज्य देऊ शकतील का ? तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्‍या बंगालमधील जनतेला ही शिक्षाच आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! – संपादक
तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

कोलकाता (बंगाल) – कोलकाता शहरातील भाटपारा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या वेळी भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्या सुरक्षारक्षकांनी हवेत गोळीबार केल्याने त्यांचे रक्षण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही हिंसाचाराचा सामना करावा लागला. त्यांनी या वेळी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी याविषयी माहिती देतांना सांगितले की, बैरेकपूर येथील भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्यावर दगडफेक झाल्यानंतर येथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. अर्जुन सिंह यांना या वेळी सुरक्षितस्थळी नेण्यात आले. या हिंसाचारामध्ये २ चारचाकी गाड्या आणि पोलिसांच्या एका वाहनाची तोडफोड करण्यात आली.

पोलिसांच्या समक्ष खासदारांवर दगडफेक !

हे बंगाल पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक

भाजपचे खासदार अर्जुन सिंह

या घटनेविषयी अर्जुन सिंह म्हणाले की, पोलिसांच्या समक्ष माझ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक केली जात होती, तसेच माझ्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली.