‘एके दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता नामजप करतांना सूक्ष्मातून मला पुढील दृश्य दिसले, ‘मी विष्णुलोकात असून माझ्यासमोर शेषशायी श्रीविष्णु आहे. तो मला म्हणाला, ‘तुझे गुरु हयातीत असेपर्यंत तुला एक ग्रंथ पूर्ण करायचा आहे.’ असे म्हणून त्याने मला पुष्कळ पाने असलेला आणि पूर्वी ऋषींच्या काळात असायचा त्यापद्धतीचा एक ग्रंथ भेट दिला अन् तो मी स्वीकारला.’ त्यानंतर मला हे दृश्य दिसणे बंद झाले. दीड वर्षापूर्वी माझा आध्यात्मिक त्रास वाढला होता, तेव्हापासून माझी सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा बंद होती. त्यामुळे मी या प्रसंगाचा फारसा विचार न करता परत नामजप करण्यास प्रारंभ केला.
दुसर्या दिवशी सकाळी एका साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पुढील निरोप मला दिला, ‘ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना (कु. मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख आणि मला) मिळत असलेल्या ज्ञानाचे ग्रंथ छापायचे आहेत आणि आजपासून त्या विषयांसंबंधी सेवा करायची आहे.’ या प्रसंगानंतर श्रीविष्णूने मला ‘ग्रंथाच्या संदर्भात सेवा करायची आहे’, याविषयी पूर्वसूचना दिल्याचे लक्षात आले आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१३.९.२०२१)
|