५७ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली तळेगाव दाभाडे, पुणे येथील चि. शौर्या रोहित रागमहाले (वय २ वर्षे) !

तळेगाव दाभाडे, पुणे येथील चि. शौर्या रोहित रागमहाले हिची आजी आणि आत्या यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. शौर्या रोहित रागमहाले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्म ते ७ मास

सौ. सुवर्णा रागमहाले

१ अ. ‘चि. शौर्या हिला उचलून घेतल्यावर मला पुष्कळ आनंद मिळतो.

१ आ. ती ५ मासांची असतांना ‘तिला आपण बोलत असलेले समजत आहे, तसेच तिच्या ते लक्षात रहात आहे’, असे मला वाटले.

१ इ. देवतांना ओळखणे : तिला ‘कृष्ण बाप्पा कुठे आहे ?’, असे विचारले की, ती घरात असलेल्या कृष्णाच्या चित्राकडे बघते. ती सप्तदेवतांच्या चित्रांकडे पाहून त्यांना ओळखते आणि त्यांची नावेही सांगते.’

– सौ. सुवर्णा रागमहाले (चि. शौर्याची आजी), तळेगाव दाभाडे, पुणे.

१ ई. ‘शौर्याचा तोंडवळा सात्त्विक वाटतो. ‘तिचा आवाज ऐकत रहावा’, असे वाटते.’

– सौ. रेखा खैरे (चि. शौर्याची आत्या), तळेगाव दाभाडे, पुणे.

२. वय १ ते २ वर्षे

२ अ. देवपूजा करणे : ‘मी सकाळी देवपूजा करत असतांना ती २० मिनिटे माझ्या समवेत बसून पूजा करते आणि पुढची कृतीही नेमकेपणाने सांगते.

२ आ. जयघोष करणे : ती सकाळी आरती झाल्यानंतर गणपतीचा जयघोष करते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहिल्यावर ‘प.पू. बाबा की जय’  असे म्हणते. (ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प.पू. बाबा’, असे म्हणते.)

२ इ. दैवी बालकांची छायाचित्रे पहाण्यास आवडणे : प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ घरी आल्यानंतर शौर्या त्यातील दैवी बालकांची छायाचित्रे पहाते आणि ‘बाल, बाल’ करून हसते. घरी दैनिक ‘सनातन प्रभात’ आल्यानंतर तिला पहिल्यांदा दैवी बालकांची छायाचित्रे दाखवावी लागतात. तिच्या या कृतीमुळे माझीही भावजागृती होते.’

– सौ. सुवर्णा रागमहाले (चि. शौर्याची आजी)

२ ई. तिला सनातन-निर्मित देवतांची चित्रे, पंचांग आणि सनातन आश्रमाचे छायाचित्र पहायला आवडते.

२ उ. तिला कापराचे उपाय करायला पुष्कळ आवडतात.

२ ऊ. शौर्या खाऊ खातांना कृष्ण बाप्पाला खाऊ खाण्यासाठी बोलावते, तसेच ती खेळतांना कृष्ण बाप्पाला खेळण्यासाठी बोलवते.’

– सौ. रेखा खैरे

स्वभावदोष

१. हट्टीपणा

२. ‘मनाप्रमाणे व्हावे’, असे वाटणे

– सौ. सुवर्णा रागमहाले (चि. शौर्याची आजी), तळेगाव दाभाडे, पुणे.

(सर्व सूत्रांचा दिनांक २.११.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.