काश्मीरच्या कुलगाममध्ये १ जिहादी आतंकवादी ठार, १ सैनिक हुतात्मा !

भारताशी १०० वर्षे शत्रुत्व न ठेवण्याचे घोषित करणार्‍या पाकचा कावेबाजपणा उघड !

एकेका आतंकवाद्याला ठार करत बसलो, तर भारताच्या मुळाशी उठलेला जिहादी आतंकवाद कधीच संपुष्टात येणार नाही ! आतंकवाद्यांचे माहेरघर बनलेल्या पाकिस्तानला नष्ट केल्याखेरीज आतंकवाद्यांचा नायनाट होणे कदापि शक्य नाही ! त्यामुळेच पाकिस्तानचे समूळ उच्चाटन करा ! – संपादक

श्रीनगर – काश्मीरच्या कुलगाममध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या एका आतंकवाद्याला ठार केले आहे. या चकमकीत रोहित छिब नावाचे पोलीस हवालदार हुतात्मा झाले, तर ३ सैनिक अन् २ नागरिक घायाळ झाले आहेत.

सैन्याधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगाम जिल्ह्यातील परिवान क्षेत्रात आतंकवादी लपल्याची माहिती सैनिकांना मिळाली. त्यांच्या शोधासाठी मोहीम राबवतांना दोन्ही गटांमध्ये चकमक उडाली.