उतारवयातही तळमळीने सेवा करणारे आणि परात्पर गुरुदेवांप्रती भाव असणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे वाराणसी येथील श्री. वेदप्रकाश गुप्ता (वय ७७ वर्षे) !

श्री. वेदप्रकाश गुप्ता

१. नम्र

श्री. वेदप्रकाश गुप्ता त्यांच्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठ्या व्यक्तींशी नम्रतेने बोलतात.

२. इतरांचा विचार करणे

त्यांना सेवाकेंद्रात कधी सत्संगासाठी बोलावल्यावर सेवाकेंद्रात येण्यासाठी त्यांना रिक्शा मिळाली नाही, तर ते एक किलोमीटर अंतर पायी चालत येतात. साधक त्यांना सांगतात, ‘‘तुम्हाला सेवाकेंद्रात यायचे असल्यास आम्हाला भ्रमणभाष करा. आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ’’; परंतु ‘साधकांना सेवा सोडून यावे लागू नये’; म्हणून ते चालत येतात.

३. प्रेमभाव

अ. साधक घरी आल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होतो. ते साधकांचे आदरातिथ्य चांगल्या प्रकारे करतात.

आ. ते प्रत्येक साधकाची आपलेपणाने विचारपूस करतात. एखादा साधक रुग्णाईत असल्यास त्याला ‘प्राथमिक स्तरावर कोणती औषधे देऊ शकतो ?’, याविषयी ते पूर्ण माहिती देतात.

इ. श्री. गुप्ताजी आता सेवानिवृत्त झाले आहेत. कार्यालयात त्यांच्या जागी आलेल्या व्यक्तीला कामाची पूर्ण माहिती नसल्याने त्यांच्या अधिकार्‍यांनी श्री. गुप्ता यांना विचारले, ‘‘तुम्ही त्यांना शिकवाल का ?’’ तेव्हा त्यांनी अधिकार्‍यांना त्वरित होकार दिला. त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या अधिकार्‍यांना काम शिकवले.

सौ. प्राची जुवेकर

४. सेवेची तळमळ

४ अ. ऊन किंवा थंडी यांची तमा न बाळगता सेवा करणे : त्यांचे वय अधिक आहे. त्यांची ‘ओपन हार्ट सर्जरी’ आणि ‘हर्निया’चे शस्त्रकर्म झाले आहे, तरीही ते पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या ३० अंकांचे वितरण करतात. ते ऊन आणि थंडी यांची तमा न बाळगता ही सेवा करतात.

४ इ. सेवेचा आढावा देणे

१. त्यांना कोणतीही सेवा दिल्यावर त्यांचा कधीही पाठपुरावा घ्यावा लागत नाही. ते स्वतःहून सेवेचा आढावा सांगतात.

२. त्यांना पाक्षिक ‘सनातन प्रभात’ मिळण्यास विलंब झाल्यास ते स्वतःहून विचारपूस करतात.

४ ई. सेवेच्या नोंदी व्यवस्थित ठेवणे : २ वर्षांपूर्वी त्यांची प्रकृती चांगली असतांना त्यांनी विज्ञापने आणि अर्पण मिळवण्याची सेवा केली होती. त्यांनी सेवेच्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या होत्या.

५. त्यागी वृत्ती

ते प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी स्वेच्छेने अर्पण करतात. त्यांच्याकडून वस्तूरूपात अर्पण झाले नसल्यास ते त्यांच्या क्षमतेनुसार धनाचे अर्पण करतात आणि स्वतःहून सेवाकेंद्रात आणून देतात.

६. भाव

६ अ. साधकांमध्ये गुरुरूप पहाणे : त्यांच्या घरी साधक आल्यावर ‘साधकांचा सत्संग मिळणार’, असा त्यांचा भाव असतो. ‘गुरुदेव आमच्यासाठी किती करतात !’, असे ते सतत म्हणतात. ते साधकांमध्ये गुरुदेवांना पहातात.

६ आ. सेवाकेंद्र आणि अर्पण यांच्याप्रती भाव : एकदा जून मासात (महिन्यात) दुपारी २ वाजता कडक उन्हाळ्यात ते सेवाकेंद्रासाठी तांदूळ घेऊन आले होते. त्यांना याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘सेवाकेंद्रासाठी अर्पण करायचे असतांना घरी अधिक काळ ठेवणे अयोग्य आहे.’’ यातून त्यांचा सेवाकेंद्र आणि अर्पण यांच्याप्रती भाव लक्षात आला.’

– सौ. प्राची जुवेकर, वाराणसी (३.७.२०१८)