उत्तरप्रदेशमध्ये ठरलेल्या वेळेतच निवडणुका होणार ! – निवडणूक आयोग

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सर्व राजकीय पक्षांनी वेळेतच निवडणूक व्हावी, असे म्हटल्याने उत्तरप्रदेशातील विधानसभेची निवडणूक वेळेतच घेतली जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन दिली.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘ओमिक्रॉन’च्या वाढलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशची आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी’, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती. यावर नुकतीच बैठक झाली असून यामध्ये सर्व पक्षांनी ‘निवडणूक वेळेतच व्हावी’ असे म्हटले आहे. ‘सर्व प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन करून निवडणूक पार पाडू’ असे त्यांनी म्हटले आहे. यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले की, ५ जानेवारीला अंतिम मतदारसूची येईल. जर कोणतीही तक्रार आली, तर त्याचे निराकरण तातडीने केले जाणार आहे.