१. हिंदूंच्या दुर्दशेचे कारण म्हणजे शतकांपासून शुद्ध राष्ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्व यांचा अभाव !
‘हिंदूंच्या दुर्दशेचे प्रमुख कारण हे आहे की, ते शतकांपासून शुद्ध राष्ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्व यांच्या अभावाशी झुंजत आहेत. परिणामी आज मुख्य धारेतील राजकीय लोकशाही, व्यवस्था आणि खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या बंधनात विवश होऊन कुंठित होत आली आहे. आमची अशी कोणती हतबलता आहे की, जी आम्हाला आपल्याविषयी घृणा आणि शत्रूत्व राखणार्या मानसिकतेचा विरोध न करता मानवतेच्या रक्षणार्थ आवश्यक कृती करण्यात संकोच निर्माण करते ? आमची पराभूत वृत्ती झाली आहे का ?
२. ‘नीच व्यक्ती कधी स्वतःच्या प्रवृत्तीचा त्याग करत नाही’, ही आचार्य चाणक्य यांची शिकवण लक्षात ठेवून भारताने त्याच्या शत्रूंना नीट ओळखून युद्धनीती आखावी !
जर आपण आपल्या शत्रूंना नीट ओळखले नाही, तर आपले सहिष्णु आणि अहिंसक इत्यादी सद़्गुण आपल्याला आत्मघाताकडे ढकलत रहाणार नाहीत का ? आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे, ‘नीच व्यक्ती कधी स्वतःच्या प्रवृत्तीचा त्याग करत नाही; म्हणून शहाण्या माणसाने सदैव सतर्क रहावे.’
३. भारताने त्याच्या ऐतिहासिक चुका आणि त्रुटी यांतून योग्य तो बोध घेऊन आत्मरक्षणार्थ ‘जशास तसे’ हे मूलतंत्र आत्मसात करणे, ही काळाची आवश्यकता !
हे योग्य आहे की, राजकीय शिष्टाचार, शालीनता आणि वैचारिक आधार यांवर शत्रूला पराजित करून पुढे जात रहाण्याची निरंतन चालणारी एक अथक प्रक्रिया आहे; तरीही जर आम्हाला पुढे जायचे असेल, तर आपल्या ऐतिहासिक चुका आणि त्रुटी यांतून योग्य तो बोध घेतला पाहिजे. आम्हाला उच्च आदर्श स्थापण्यासाठी आत्मरक्षणार्थ ‘जशास तसे’ हे मूलतंत्र आत्मसात करावे लागेल.
४. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांनी धर्मरक्षणार्थ दुष्टांचा समूळ नाश केला, त्यातून आजचे भारतीय नेते प्रेरणा कधी घेणार ?
हिंदु समाज धर्मग्लानीच्या काळापूर्वीच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा का घेत नाही ? प्रभु श्रीरामाने ऋषिमुनींचे दुष्ट राक्षसांपासून रक्षण करून आपल्या धर्माचे पालन केले नाही का ? महाज्ञानी रावणाचा वध करून श्रीरामाने दिलेला प्रेरणादायी संदेश विसरून आपल्याला विरोध करणार्यांवर कोणताही प्रहार करणार नाही का ? अशाच प्रकारे भगवान श्रीकृष्णाने धर्मरक्षणार्थ महाभारताचे युद्ध घडवले होते, हे समजून न घेता केव्हापर्यंत स्वतःला अज्ञानात ठेवून कातडी वाचवत रहाणार ? अज्ञानाच्या स्थितीमध्ये किती काळ शत्रूंच्या षड्यंत्रांना बळी पडत रहाणार ? जे कधी आचरणात आणले जाणार नाही, अशा श्रद्धांचे मूल्य कधी टिकून राहील का ?
५. हिंदूंचा भयानक नरसंहार आणि धर्मांतर हा भारतीय नेत्यांच्या निष्क्रीयतेचा परिणाम !
काही इतिहासपुरुषांच्या मूर्ती तोडणे आणि त्यांना अपमानित करणे यांवर राजकीय अन् सामाजिक वादविवाद भडकत रहातात. मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दोष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता.
६. भारताच्या महान सुपुत्रांची खरी राष्ट्रवादी नीती समजून घेऊन देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !
जर मोगल काळात हिंदूंच्या मानबिंदूंच्या रक्षणार्थ उभे रहाणारे राणा संगा, महाराणा प्रताप, समर्थ रामदासस्वामी, राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह, छत्रसाल इत्यादींचे अभियान यशस्वी झाले असते, तर आमचा इतिहास एवढा कष्टदायक झाला असता का ? याच शृंखलेत भारताचे महान सुपुत्र स्वामी दयानंद सरस्वती, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि
डॉ. हेडगेवार इत्यादींची राष्ट्रवादी नीती समजून घेतली असती, तर आज पाकिस्तानची निर्मिती झालीच नसती. आजसुद्धा आम्ही देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्यांना कारागृहात टाकण्याऐवजी राजकीय पातळीवर सन्मानित होतांना पहात आहोत. राजकीय द्वंद्व व्यक्तीगत स्वार्थ आणि सत्तालोलुपता यांमुळे राष्ट्रीयत्वाचा गळा घोटत रहाणार आहे का ?
७. आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर वीर हिंदु हुतात्मे आजच्या भारतीय नेत्यांचा धिक्कार करतील !
हे योग्य आहे की, आम्ही विध्वंसक आणि स्फोटक अमानवीय संस्कृतीचे वाहक नसून सृजनात्मक निर्मिती अन् रचनात्मक कार्यांची संस्कृती असणार्या समाजाचे अंग आहोत. अशा वेळी ‘आम्ही आमचे विरोधक आणि शत्रू यांच्याशी सहिष्णुतेने रहाणार आणि त्यांच्याशी कोणतेही वैमनस्य बाळगणार नाही’, असे का ? आमचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ होणार्या लक्षावधी बलीदानांपासून प्रेरित होऊन आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर आपल्याला कधीतरी संतोष होेऊ शकेल का ?
८. हिंदूंनी सद़्गुणविकृती सोडून शत्रूविरुद्ध आक्रमक होणे आवश्यक !
हिंदू स्वतःच्या अहिंसा, सहिष्णुता आणि उदारता आदी गुणांसाठी कट्टर होऊ शकतात; परंतु त्यांना स्वतःचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ संघर्षवादी होण्यापासून कोण रोखत आहे ? धर्मांधांच्या षड्यंत्रांप्रती मौन बाळगण्याविषयी हिंदूंना शाप मिळाला आहेत; म्हणून ते प्रतिदिन धर्म आणि देश यांवर होणार्या अनेक अत्याचारांविषयी आक्रोश करत नाहीत का ?
९. राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवा !
आपण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांना वाचवण्यासाठी दगडफेक करणार्यांना अन् भारताविषयी प्रेम नसणार्यांना लक्ष्य बनवून राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देण्याऐवजी उलट त्यांना पुनःपुन्हा न्यायालयाच्या पिंजर्यात अडकवणार्या षड्यंत्रावर मौन बाळगण्याला का विवश होतो ? कोणता सभ्य देश हे स्वीकारील का ? देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्यूहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे यांमुळे सैनिकांचे मनोबळ ढासळणार नाही का आणि अशा स्थितीत अन्य सामान्य नागरिकांची मनोदशा कशी बरे स्वस्थ राहू शकेल ? सत्तापिपासू असलेल्यांची राष्ट्रीयता जर संशयास्पद असेल, तर ते योग्य ठरील का ?
१०. राष्ट्रीय ऐक्य आणि अखंडता टिकवण्यासाठी सर्व देशवासियांसाठी समान लोकसंख्या नीती बनवणे आवश्यक !
राष्ट्रीय ऐक्य आणि अखंडता यांना सुदृढ राखणे अन् देशाला सीरिया, पाकिस्तान, मोगलीस्तान इत्यादी बनण्यापासून वाचवायचे असेल, तर सर्वांत उत्तम उपाय म्हणजे, सर्व देशवासियांसाठी समान लोकसंख्या नीती बनवली गेली पाहिजे.’
– श्री. विनोदकुमार सर्वोदय, उत्तरप्रदेश (साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)