‘केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर आता मंत्र्यांची एकूण संख्या ७८ झाली आहे. त्यांतील ४२ टक्के म्हणजे ३३ मंत्र्यांच्या विरोधात विविध गुन्हे नोंद आहेत. त्यातही २४ जणांच्या विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडे घालणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ने (‘ए.डी.आर्.’ने) याविषयीच्या माहितीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्व मंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहितीवरून ही माहिती समोर आली आहे.’