तरुणींमध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करून ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे !
- नगरमध्ये ‘लव्ह जिहाद’ची घटना !
- गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने पीडितेचा मृत्यू
नगर – येथे सईद ताहिर बेग याने एका २० वर्षीय हिंदु दलित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडिता गर्भवती झाल्यानंतर सईद याने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर पीडितेचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. पीडित कुटुंब आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या दबावामुळे पोलिसांनी गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपीला अटक केली आहे. (धर्मांधावर गुन्हा नोंदवून अटक करण्यासाठी दबाव आणायला हा देश पाकिस्तान आहे का ? – संपादक)
१. पीडितेच्या कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे सईद बेग पीडितेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करत होता. त्यामुळे पीडिता ४ मासांची गर्भवती राहिली. याविषयी पीडितेने घरी माहिती दिली. असे समजते की, सईद बेग याने पीडितेला बाजारातून गर्भपात करण्याचे औषध आणून खायला दिले. त्यामुळे पीडितेची प्रकृती बिघडली आणि तिला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला. सईद ताहिर बेग हा पूर्वीपासून विवाहित होता.
२. पीडितेच्या आईने सांगितले, ‘‘मुलीला अन्नबाधा झाली असल्याचे मला सांगण्यात आले. मी अंतिम संस्कारासाठी गेले. तेव्हा तेथील लोकांकडून समजले की, ती गरोदर होती. त्यानंतर भाच्याकडून समजले की, तिचे सईदशी संबंध होते. त्यानंतर मी सईद ताहिरच्या विरोधात तक्रार नोंदवली.’’
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार