संभल (उत्तरप्रदेश) येथे श्री चामुंडादेवी मंदिरातील मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संभल (उत्तरप्रदेश) – गुन्नौर क्षेत्रातील श्री चामुंडादेवीच्या मंदिरातील मूर्तीची  अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ५ डिसेंबरच्या रात्री घडली. सकाळी जेव्हा भाविक मंदिरात आले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. ही घटना चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. येथील वातावरण तणावपूर्ण झाल्याने येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ‘आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल’, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले. स्थानिक लोकांचा आरोप आहे की, अशा घटना येथे यापूर्वीही घडल्या आहेत; मात्र पोलीस कुणाला तरी अटक करून कारवाई केल्याचे दाखवत असतात. (अशा पोलिसांना सरकारने सेवामुक्त करून कारागृहाचा रस्ता दाखवला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)