१. इतरांना साहाय्य करणे
अ. ‘कु. जया सिंह (जयादीदी) नेहमी इतरांचा विचार करते. कुणा साधकाला कधी साहाय्याची आवश्यकता असेल, तर ती त्याला त्वरित साहाय्य करते.
आ. ‘आम्ही धर्मप्रसार सेवेच्या दृष्टीने सर्व साहित्य घेतले ना !’, याकडे तिचे लक्ष असते. त्या वेळी आमच्याजवळ अत्तर अन् कापूर नसेल, तर ती आम्हाला लगेच आणून देते.
२. भाव
तिच्या मनात साधकांप्रती पुष्कळ प्रेमभाव आहे आणि संतांप्रती पुष्कळ भाव आहे.
३. धर्मप्रसाराची तळमळ
अ. साधक धर्मप्रसारसेवेला जातांना पाहून तिला पुष्कळ आनंद होतो.
आ. तिला ‘धर्मप्रसारसेवेला जावे’, असे वाटते; पण सेवाकेंद्रात सेवा असल्यामुळे तिला प्रसारसेवेला जाणे शक्य होत नाही.
इ. ती आम्हाला ‘प्रसारसेवा करतांना मध्ये मध्ये प्रार्थना करत रहा’, असे आपुलकीने सांगते.’
– कु. मीरा (ऑक्टोबर २०१९)