देशात अधिकोषांतील निष्क्रीय खात्यांमध्ये २६ सहस्र कोटी रुपये पडून ! – केंद्रीय अर्थमंत्री

९ कोटी खात्यांमध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही व्यवहार नाही !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

नवी देहली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी भारतातील अधिकोषांतील निष्क्रिय खाती (ज्यांचा वापर संबंधितांकडून अनेक मास आणि वर्षे केला गेलेला नाही) आणि त्यांमधील रकमेच्या संदर्भात माहिती दिली. देशातील बँकांमधील विविध खात्यांमध्ये २६ सहस्र कोटी रुपये पडून असून त्यांपैकी ९ कोटी खाती अशी आहेत, ज्यांमध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेने एक वर्षांहून अधिक निष्क्रीय किंवा कोणताही व्यवहार न झालेल्या खात्यांचे प्रतिवर्षी मूल्यांकन करण्यास प्रारंभ केला आह. यासह खात्यांच्या निष्क्रीयतेविषयी खातेधारकांकडून माहिती मागवण्याच्या संदर्भात निर्देश दिल्याचीही माहिती देण्यात आली.