पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार
‘राजा दशरथाच्या राज्यसभेत (दरबारात) वसिष्ठ ऋषि, महर्षि गौतम, महर्षि वामदेव, जाबाल ऋषि, कश्यप ऋषि, दीर्घायु मार्कंडेयजी, सुयज्ञ ऋषि, महर्षि कात्यायन आदी अनेक ॠषिमुनी मंत्रीपदावर विराजमान होते. या ब्रह्मर्षींसोबतच पूर्व परंपरागत ऋत्विज (ब्रह्मज्ञानी) हेही मंत्री म्हणून कार्य करत असत आणि त्यांच्या समुपदेशाने (सल्ल्याने) संपूर्ण राज्यव्यवस्था चालवली जात असे. वाल्मिकि रामायणात याचा उल्लेख आहे; परंतु ‘संतांनी राजकारणात येऊ नये आणि धर्म अन् राजकारण हे दोन्ही वेगळे ठेवावे’, असे आताचे काही अज्ञानी आणि एकतर्फी आचरण करणारे म्हणतात. राजकारणाचा आत्मा ‘धर्म’ आहे. धर्मविरहित राजकारण शासनकर्त्यांना नीतीशून्य आणि आदर्शशून्य बनवून त्यांना असुरांसारखे वागण्यास प्रवृत्त करते.’
– पू. तनुजा ठाकूर (१७.११.२०२१)