श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे विचारधन !

श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ

संतांनी ‘आशीर्वाद’ म्हणून दिलेली माळ सिद्ध करण्याची आवश्यकता नसणे आणि त्यासंबंधी ‘संतांचा आशीर्वाद’ अन् ‘ती माळ घालणार्‍या साधकाचा भाव’ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असणे

‘एकदा एका संतांनी एका व्यक्तीला आशीर्वाद म्हणून गळ्यात घालण्यासाठी रुद्राक्षांची एक माळ दिली. त्या व्यक्तीने संतांना विचारले, ‘‘ही माळ गळ्यात घालण्यापूर्वी ‘सिद्ध’ (माळ वापरण्यापूर्वी माळेची काही पूजा इत्यादी) करायची का?’’ याविषयी श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘कर्माला सिद्धता असते, तर भावाला नसते. ही माळ जर दुकानातून विकत घेतली, तर कर्मकांडाप्रमाणे तिला ‘सिद्ध’ करून घालणे आवश्यक आहे. जेव्हा संत अशा वस्तू (उदा. माळ) भक्तांना ‘आशीर्वाद’ म्हणून देतात, तेव्हा त्या वेगळ्या प्रकारे सिद्ध करण्याची आवश्यकता उरत नाही. संतांनी माळ देतांना त्यांचा संकल्प होतो आणि ती माळ त्यांच्या आशीर्वादानेच सिद्ध होते, तसेच संत ज्याला ती माळ देतात, त्याचाही ‘भाव’ चांगला असेल, तर त्याचा ‘भाव’च त्या माळेतील आशीर्वाद टिकवतो आणि तो कायमस्वरूपी माळ सिद्ध करतो. येथे संतांचा आशीर्वादही महत्त्वाचा आणि ती माळ घालणार्‍या साधकाचा भावही महत्त्वाचा असतो.’

– श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१.५.२०२०)