५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील चि. जिजा विपुल शेवाळे (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. जिजा विपुल शेवाळे ही या पिढीतील एक आहे !

भागवत एकादशी (१५.११.२०२१) या दिवशी चि. जिजा विपुल शेवाळे हिचा दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

चि. जिजा शेवाळे

चि. जिजा विपुल शेवाळे हिला दुसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

‘सौ. आरती (चि. जिजाची आई) गर्भधारणा झाल्यापासून अथर्वशीर्ष आणि गणेशपुराण यांचे वाचन करत होती, तसेच ती पारायणालाही बसत होती. त्या वेळी तिला ‘बाळ हालचाल करून प्रतिसाद देत आहे’, असे जाणवायचे.

२. जन्माच्या वेळी

सौ. आरतीचे शस्त्रकर्म एकादशीच्या आदल्या दिवशी होणार होते; परंतु काही कारणास्तव ते रहित झाले आणि शस्त्रकर्म एकादशीला होऊन बाळाचा जन्म झाला. मी आणि माझा मुलगा विपुल शाकाहारी आहोत आणि एकादशीला आमचा उपवास असतो. त्यामुळे देवाने आम्हाला एकादशीचा ‘प्रसाद दिला आहे’, असे वाटले.

सौ. जयश्री शेवाळे

३. जन्मानंतर

अ. चि. जिजाच्या खोलीत दत्त आणि श्रीकृष्ण यांचे छायाचित्र आहे. त्याकडे ती पुष्कळ वेळ बघत बसते. तेव्हा ‘ती त्यांच्याशी काहीतरी बोलत आहे’, असे जाणवते.

आ. दूरदर्शनवर कीर्तन चालू असेल, तर ती एकटक बघत रहाते.

इ. झोपल्यावर जरासा आवाज झाला, तरी तिला जाग येऊन ती उठून बसते; पण दत्ताचा नामजप भ्रमणभाषवर चालू असतो, तो तिला चालतो.

४. वय ५ मास

चि. जिजा ५ मासांची होती. त्या वेळी तिला कीर्तनाला नेले होते. तिथे पुष्कळ आवाज होता, तरी ती २ घंटे मांडीवर शांत बसली होती. इतर वेळी ती अशी शांत बसत नाही.

५. वय ९ मास

अ. जिजा ९ मासांची असतांना तिला उलट्या आणि जुलाब होत होते. त्या वेळी ती काही खातही नव्हती, तरी व्यवस्थित खेळत होती. तिच्याकडे पाहिल्यावर ‘ती आजारी आहे’, असे वाटत नव्हते.’

– सौ. जयश्री शेवाळे (चि. जिजाची आजी)

आ. ‘जिजाला दिसेल, त्या सर्व वस्तू खेळायला हव्या असतात; पण ती भ्रमणभाषला हातही लावत नाही किंवा भ्रमणभाषवर ‘व्हिडिओ कॉल’ आला, तरी त्याकडे पहात नाही.’ – सौ. आरती (चि. जिजाची आई)

इ. ‘घरात कुणी काही खात असेल, तर तिला ते हवे असते; पण कुणी तामसिक आहार घेत असेल, तर ती त्याकडे बघतही नाही.

ई. जिजा ९ मासांनंतर ठाण्याला आली. ती ठाण्याला घरी येत असतांना थोडा वेळ पाऊस पडला. तेव्हा ‘वरुण राजाने तिचे स्वागत केले आहे’, असे आम्हाला वाटले.

उ. आरत्या किंवा देवाची गाणी म्हणत असतांना ती टाळ्या वाजवते आणि इतर गाणी म्हटल्यावर नाचते. ती रडत असेल, तेव्हा आरती म्हटली, तर ती लगेच टाळ्या वाजवायला लागते.

ऊ. ती घरात आल्यापासून केर काढतांना अनेकदा दैवी कण दिसतात.’

– सौ. जयश्री शेवाळे (चि. जिजाची आजी), कोलशेत केंद्र, ठाणे. (१०.९.२०२०)