
सातारा, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – खंबाटकी बोगद्याजवळ धोम-बलकवडी कालव्याच्या उताराला सचिन कैलास गिरमे हे दुचाकीवरून घसरून पडले. त्या वेळी पाठीमागून येणारा माल वाहतूक करणारा ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. या अपघातामध्ये गिरमे हे जागीच ठार झाले.
काही वेळाने त्याच उतारावरून पुन्हा एक माल वाहतूक करणार्या ट्रकने क्रेटा, डस्टर आणि इर्टिका या गाड्यांना धडक दिली. यामध्ये क्रेटा गाडीची पुष्कळ हानी झाली. खंडाळा आणि महामार्ग पोलीस यांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. या अपघातामध्ये घायाळ झालेल्या ६ रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्या संपल्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी होती. अपघातामुळे २-३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !