काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून अभाविपच्या कार्यकर्त्यावर आक्रमण !
|

उनाकोटी (त्रिपुरा) – येथे शुक्रवार, २९ ऑक्टोबर या दिवशी कैलाशहर भागातील महाकाली मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मूर्तीची तोडफोड केली, तसेच मंदिराचीही हानी केली. ‘जमावाने येथील एका मशिदीला आग लावली’, हा अफवेनंतर धर्मांधांनी ही तोडफोड केली. दुसर्या एका घटनेत अखिल भारतीय विद्यार्थी परिदेचे पदाधिकारी शिवाजी सेनगुप्ता यांच्यावर काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना एन्.एस्.यू.आय., तसेच तृणमूल काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना तृणमूल छात्र परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. यात सेनगुप्ता घायाळ झाले. शुक्रवारी राज्यातील १ सहस्र १०० मशिदींमध्ये मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात चिथावणी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच प्रशासनाने या भागात कलम १४४ लागू करून जमावबंदी केली आहे. (जमावबंदी असतांना धर्मांध अशा प्रकारचा हिंसाचार कसे करू धजावतात ? पोलीस या वेळी कुठे होते ? जमावबंदी असूनही अशी घटना घडणार असेल, तर हिंदूंनी कर भरून पोलिसांना पोसायचे तरी कशाला ? – संपादक)
Tripura: Islamists vandalise Kali temple, NSUI and TMCP members stab ABVP worker in Kailashaharhttps://t.co/hqPhInp3HY
— OpIndia.com (@OpIndia_com) October 30, 2021
| वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !