परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘तुमचा शब्दांच्या पलीकडचा टप्पा, म्हणजे साधनेतील ‘विश्वकार्याचा’ टप्पा चालू झाला आहे’, असे सांगणे

शिष्याला पुढच्या पुढच्या टप्प्याला नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘एकदा आम्ही दैवी दौर्‍यावर असतांना एका ज्ञानाच्या धारिकेतील काही उत्तरे काढण्यासाठी मला आश्रमातून एक धारिका पाठवली होती. त्याविषयी मी परात्पर गुरुदेवांना भ्रमणभाषवर म्हणाले, ‘‘गुरुदेव, अजून मी त्या धारिकेतील प्रश्नाचे उत्तर काढले नाही; परंतु लवकरच मी ती सेवा पूर्ण करते.’’

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

तेव्हा गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुम्ही आता ज्ञान ग्रहण करण्याची सेवा करण्याची आवश्यकता नाही. तुमचा ज्ञानाचा टप्पा संपला आहे. देवाच्या कृपेने आपल्या काही साधकांनाही ईश्वरी ज्ञान मिळत आहे. देवाने आपली सोय केली आहे. आता परत तुम्ही शब्दांच्या पातळीला येऊ नका. आता तुमचा शब्दांच्या पलीकडचा टप्पा, म्हणजे साधनेतील ‘विश्वकार्याचा’ टप्पा चालू झाला आहे.’’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१८.४.२०२०)