‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

एका समुहाच्या तरुणांपासून ख्रिस्ती तरुणींना वाचवण्याविषयी केरळमधील बिशपचे पाद्र्यांना पत्र

  • ‘पाल डायसस’ने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आवाज उठवणे

  • ३ ते ४ मासांपासून १५ ते २२ वर्षे वयोगटातील ख्रिस्ती तरुणींची फसवणूक 

  • वर्ष २०२० मध्ये सायरो-मालाबार चर्चकडून ‘लव्ह जिहाद’विषयी चिंता व्यक्त

‘लव्ह जिहाद’ मुळे देशात मुसलमानेतर लक्षावधी तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. हे लक्षात घेऊन सरकारने ‘लव्ह जिहाद’ ही राष्ट्रीय समस्या घोषित करावी आणि त्याविरोधात राष्ट्रीय स्तरावर कायदा करण्यासाठी सर्व हिंदू, शीख, जैन आणि ख्रिस्ती समाजाने एकत्र आले पाहिजे ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

त्रिवेंद्रम् – केरळमध्ये सायरो-मालाबार चर्चच्या पाल डायससच्या बिशपने त्यांच्या डायससच्या पाद्र्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी डायससशी संंबंधित कुटुंबातील मुलींना ‘काही समुहाचे लोक फसवण्याचे प्रयत्न करत असल्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा’, असा सल्ला दिला आहे. या पत्रामध्ये बिशप मार जोसेफ कल्लारंगट यांनी विशिष्ट समुहाचा उल्लेख केला नसला, तरी ख्रिस्ती युवतींना ‘लव्ह जिहाद’पासून सावध करण्यासाठीच त्यांनी हे पत्र लिहिले असल्याचे संकेत या पत्रातून मिळत आहेत.

१. काही मासांपूर्वी ‘पाल डायसस’ने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. तसेच केरळ कॅथॉलिक बिशप काऊन्सिलही राज्यात ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे सातत्याने सांगत आहे. त्यामुळे बिशप कल्लारंगट यांनी ‘लव्ह जिहाद’विषयी सतर्क करण्यासाठीच हे पत्र लिहिले असल्याचे स्पष्ट होते.

२. त्यांनी म्हटले आहे की, या समुहातील एक व्यक्ती स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी किंवा या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी संपर्क करते. त्यांचा विश्वास संपादन करते आणि नंतर त्यांना, ‘सध्या मी विदेशात असून मला एक प्रबंध सादर करायचा आहे. त्यासाठी मला  तरुण मुलींच्या प्रतिक्रिया हव्या आहेत.’ असे सांगून मुलीचे संपर्क क्रमांक मिळवते. या संपर्क क्रमांकांच्या माध्यमातून ते मुलींशी जवळीक साधते आणि त्यांची फसवणूक करते.

३. बिशप कल्लारंगट यांनी म्हटले की, सावध राहूनही ही समस्या सुटली नाही, तर ते याविषयी अन्वेषण करण्याची मागणी करतील. मागील ३ ते ४ मासांपासून अशा काही घटना समोर आल्या आहेत. ज्यात १६ ते २२ वर्षांच्या तरुणींना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना मोठा मानसिक आघात पोचला आहे.

४. यापूर्वी जानेवारी २०२० मध्येही केरळच्या सर्वांत मोठ्या सायरो मालाबार चर्चने राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांविषयी चिंता व्यक्त केली होती. सायरो मालाबारच्या ‘प्रसारमाध्यम आयोगा’च्या अहवालामध्ये ‘लव्ह जिहाद’च्या नावावर ख्रिस्ती मुलींना लक्ष्य केले जात असून त्यांच्या हत्या होत आहेत. त्यामुळे केरळमध्ये धर्मनिरपेक्षता, सद्भाव आणि सामाजिक सलोखा यांना धोका निर्माण झाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.


ब्लॅकमेल करून अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला गावकर्‍यांचा चोप 

मध्यप्रदेशमध्ये लव्ह जिहाद !

भोपाळ (मध्यप्रदेश) – शिवपुरी जिल्ह्यामध्ये नदीम खान या धर्मांधाने एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून बलात्कार केला. (बलात्कार करणार्‍या धर्मांधांना शरीयत कायद्याप्रमाणे शिक्षा केल्यास अशा घटनांना आळा बसण्यास वेळ लागणार नाही ! – संपादक) याविषयी माहिती मिळताच गावकर्‍यांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात अपहरण आणि बलात्कार केल्यावरून पॉक्सो अन् ॲट्रॉसिटी या कायद्यांच्या अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ व्या इयत्तेत शिकणारी पीडिता शिक्षणासाठी बदरवास येथे बसने ये-जा करत होती. जानेवारी २०२१ मध्ये तिची २१ वर्षाच्या नदीम खानशी भेट झाली. त्यानंतर त्याने तिचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन परिचय वाढवला. १ मार्च या दिवशी त्याने पीडितेला फूस लावून भरका सालोन या पर्यटनस्थळावर फिरायला नेले. तेथे त्याने पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करून अनेक वेळा बलात्कार केला.


शुजालपूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांधांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या करून मृतदेह तलावात फेकला !

पीडितेच्या वडिलांचा आरोप

मध्यप्रदेशमध्ये लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता या संदर्भातील कायद्याचा समाजकंटकांना धाक वाटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कायद्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक आहे ! – संपादक 

शुजालपूर (मध्यप्रदेश) – एक सप्ताहापासून बेपत्ता असलेल्या नरोला हिरापूर येथील अल्पवयीन मुलीचा मृतदेह एका तलावामध्ये आढळून आला. ‘धर्मांधांनी मुलीवर बलात्कार केला असून त्यांनी तिची हत्या करून मृतदेह तलावामध्ये फेकून दिला’, असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.

पीडिता बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी शाकिब, सलामुद्दीन आणि इक्बाल यांच्या विरोधात प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवला होता. त्यानंतर ३ दिवसांनी पीडितेचा मृतदेह एका तलावातून बाहेर काढण्यात आला. या तक्रारीमध्ये वडिलांनी म्हटले की, ‘‘मी रात्री घरी येत असतांना माझ्या घराजवळ शाकिब, सलामुद्दीन आणि इक्बाल एका झाडाखाली बसले असून ते मला उद्देशून काहीतरी बोलत आहेत, असे मला दिसले. त्यानंतर ३ वाजता माझी मुलगी बेपत्ता झाली. या तिघांनी माझ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले असावे, असा संशय आहे.’’

या प्रकरणी ग्रामप्रधान प्रतिनिधी यशवंतसिंह माळी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या नावे निवेदन देण्यात आले. यात त्यांनी ‘हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असून सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशी द्यावी, अशी मागणी केली आहे.


धर्मांधाने हिंदु नावाने महिलेशी लग्न करून तिचे बलपूर्वक केले धर्मांतर !

देहली येथे ‘लव्ह जिहाद’

धर्मांध हिंदु महिलांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी सर्वच प्रकारे कारस्थान करत आहेत. हे साधे षड्यंत्र नसून हिंदु धर्माच्या विरोधात धर्मांधांनी पुकारलेले युद्ध आहे. हे लक्षात घेऊन हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात संघटित होणे आवश्यक आहे ! – संपादक

देहली – येथे धर्मांधाने बनावट (खोट्या) आधार कार्डच्या माध्यमातून एका हिंदु महिलेशी लग्न केले. त्यानंतर तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. ‘आरोपीने बनावट आधार कार्डाच्या माध्यमातून त्याचा खरा धर्म लपवला, तसेच धर्मांतराला विरोध केला असता त्याने जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली’, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी धर्मांधाला अटक केली आहे. ‘आधार कार्डाशी छेडछाड करणे, हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुन्हा आहे. आरोपीला जामीन दिला, तर तो पुराव्यांशी छेडछाड करेल’, असे स्पष्ट करून न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला.

१. आरोपीने ‘राहुल शर्मा’ या बनावट नावाने आधार कार्ड बनवले होते. लग्न करण्यापूर्वी राहुल नावाचे कार्ड महिलेला दाखवले होते.

२. आरोपीने एका मंदिरामध्ये महिलेशी लग्न केले होते. मुलीच्या वाढदिवसाच्या वेळी महिलेला तिचा पती मुसलमान असल्याचे समजले.

३. त्यानंतर तो इस्लामी परंपरेप्रमाणे लग्न करण्याचा आग्रह करू लागला. त्याच्या दबावामुळे महिलेला मुसलमान परंपरेप्रमाणे ‘निकाह’ही करावा लागला.

४. त्या वेळी सामाजिक दबावामुळे महिला पोलिसांकडे गेली नाही. त्यानंतर आरोपी तिला इस्लाममध्ये धर्मांतरित होण्यासाठी दबाव निर्माण करू लागला.

५. यानंतर आरोपीने हिंदु धर्माविषयी अपशब्द वापरले, तसेच त्याने ती महिला आणि तिची मुलगी यांचा छळ केला. निकाह केल्यानंतर त्याने अन्य हिंदु मुलीलाही फसवण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप महिलेने केला आहे.