नागरिकांना स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही कचऱ्याचे वर्गीकरण करायला सांगावे लागणे हे दुर्दैवी ! – संपादक
मिरज, २९ सप्टेंबर (वार्ता.) – नागरिकांनी ओला-सुका कचरा यांचे वर्गीकरण करूनच तो कचरा गाडीत घालावा, असे आवाहन महापालिकेचे मिरजेचे साहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी केले. या प्रसंगी घोरपडे यांनी अन्य कचरा वर्गीकरणाची नागरिकांना माहिती दिली. ब्राह्मणपुरी परिसरात सनातनच्या आश्रमासमोर महापालिकेच्या वतीने नागरिकांना ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेच्या अंतर्गत कचरा विलगीकरणाची माहिती देण्यात आली. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले. या वेळी स्वच्छता निरीक्षक मेघनाराणी कांबळे, दिलीप मद्रासी, आकाश मद्रासी, मेघाली जोशी, सामाजिक कार्यकर्ते पवन ठोंबरे, सुधीर गोरे परिसरातील नागरिक श्रीमती अनुपमा काशिनाथ कुलकर्णी, कु. देवश्री नितीन कुलकर्णी उपस्थित होते.