काँग्रेसच्या संकल्पपत्रामध्ये मुसलमानांच्या लांगूलचालनावर भर

  • उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

  • दंगलीविरोधातील खटले मागे घेण्यासमवेतच मदरशांचे आधुनिकीकरण, पोलीस खात्यात मुसलमानांची भरती आणि मॉब लिंचिंगच्या (जमावाकडून केलेल्या हत्येच्या) विरोधात कायदा करण्याचे आश्‍वासन !

  • काँग्रेसची मुस्लीम लीगच्या दिशेने वाटचाल ! – संपादक
  • भारताच्या स्वातंत्र्यापासून पिढ्यान्पिढ्या मुसलमानांचा लाळघोटेपणा करण्यात धन्यता मानणार्‍या काँग्रेसकडून आणखी काय अपेक्षा करणार ? लांगूलचालनाच्या या धोरणामुळेच बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात हिंदूंना दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • काँग्रेसच्या हिंदुविरोधी धोरणामुळेच ती आज शेवटचा श्‍वास कंठित आहे. काँग्रेसची उरलीसुरली राजकीय शक्ती संपुष्टात आणण्यासाठी हिंदूंसमोर उत्तरप्रदेश निवडणुकांच्या रूपात चांगली संधी आहे. हिंदूंनी जात, संप्रदाय आदींना विसरून व्यापक हिंदूसंघटनाचा आविष्कार दाखवावा, असेच भारतभरातील धर्मप्रेमी हिंदूंना वाटते ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

लक्ष्मणपुरी – तीन दशकांपासून उत्तरप्रदेशच्या सत्तेपासून लांब असलेल्या काँग्रेसचा मुसलमान मतपेढीच्या आधारे सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. यासाठी काँग्रेस पक्षाने १६ सूत्री संकल्पपत्र (घोषणापत्र) घोषित केले असून त्यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायद्याचा विरोध करण्यासाठी धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीचे सर्व खटले मागे घेण्याचा प्रामुख्याने समावेश आहे. या समवेतच गोहत्या करणार्‍यांच्या विरोधात प्रविष्ट केलेले खटले मागे घेणे, तसेच मदरशांचे आधुनिकीकरण करणे, मदरसा शिक्षकांना वेतन देणे, पोलीस खात्यात मुसलमानांची भरती करणे आदी आश्‍वासनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

याखेरीज प्रत्येक मुसलमान विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती, गेल्या ३० वर्षांमध्ये वक्फ बोर्डाच्या संपत्तीमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी करून दोषींना शिक्षा करणे, प्रत्येक मंडलमध्ये युनानी वैद्यकीय महाविद्यालय उघडणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. युनानी नावाची वैद्यकीय उपचार पद्धती ही अरबी-इराणी पद्धत असून तिचा प्रामुख्याने मुसलमान देशांमध्ये वापर करण्यात येतो.

१. वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस पक्षाने मुसलमानांचे मोठ्या प्रमाणात लांगूलचालन करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्यासाठी त्यांनी संकल्पपत्र घोषित केले आहे. हे संकल्पपत्र प्रत्येक मुसलमानाच्या घरी पोचवण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे.

२. उत्तरप्रदेशमध्ये २० टक्के मतदार हे मुसलमान आहेत. त्याचा परिणाम १४३ मतदारसंघांमध्ये दिसून येतो. ३६ मतदारसंघांमध्ये मुसलमानांचा दबदबा आहे. हे लक्षात घेऊन काँग्रेसने इम्रान मसूद याला अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचा राष्ट्रीय सचिव केले आहे.

३. संकल्पपत्राच्या प्रती प्रत्येक शुक्रवारी नमाज पठणानंतर मशिदींच्या बाहेर वितरित करण्यात येणार आहेत. यासाठी अल्पसंख्यांक मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना दायित्व देण्यात येणार आहे.

४. काँग्रेसने मौलाना (इस्लामी अभ्यासक) आणि उलेमा (इस्लामी धर्मज्ञानी) यांच्या बैठका घेणे चालू केले आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे हे संकल्पपत्र घोषित करण्यात आले आहे. काँग्रेसच्या लांगूलचालनाविषयी बोलतांना भाजपने म्हटले आहे की, राममंदिराला विरोध करण्यापासून आतंकवाद्यांसाठी अश्रू ढाळणारी काँग्रेस नेहमी लांगूलचालनाचे राजकारण करत आली आहे.