नांदेडचे विवेक राम चौधरी भारताचे नवे वायूदल प्रमुख होणार !

भारताच्या वायूदलाचे नवीन प्रमुख विवेक राम चौधरी

नवी देहली – भारताच्या वायूदलाचे नवीन प्रमुख म्हणून विवेक राम चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान प्रमुख आर्.के.एस्. भदौरिया हे ३० सप्टेंबर या दिवशी निवृत्त होत आहेत. नवे एअर चीफ मार्शल विवेक चौधरी हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा या छोट्याशा गावाचे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड येथे झाले. विवेक चौधरी यांचे आजोबा हदगाव तालुक्यातील कोळी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते.