५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला  कु. वेदांत आनंद पाटील (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. वेदांत आनंद पाटील आहेत !

(‘वर्ष २०१५ मध्ये कु. वेदांत आनंद पाटील याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती. तो मूकबधिर आहे.’ – संकलक)

कु. वेदांत पाटील

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. व्यवस्थितपणा : ‘तो स्वतःचे वैयक्तिक आवरणे स्वतःच करतो. व्यवस्थितपणा हा गुण त्याच्यामध्ये चांगला आहे, उदा. कपड्यांच्या घड्या घालणे, दप्तर व्यवस्थित ठेवणे, स्वत:च्या वस्तूंची काळजी घेणे इत्यादी.

१ आ. प्रेमभाव : लहान मुलांविषयी त्याला अधिक ओढ आहे. तो त्यांची व्यवस्थित काळजी घेतो. लहान मुलांना त्रास दिलेला त्याला आवडत नाही.

१ इ. झोपेतही ईश्वराशी अनुसंधान असणे : ‘त्याचे झोपेतही ईश्वराशी अनुसंधान आहे’, हे एका रात्री मला जाणवले. त्या रात्री २.३० वाजता उठून त्याने मला उठवले आणि ‘समोर कृष्ण आहे. त्याला नमस्कार करा’, असे खुणेने सांगितले. त्यानंतर स्वतः नमस्कार करून तो झोपला. तेव्हाही त्याचे हात नमस्काराच्या मुद्रेत जोडलेले होते.

२. कु. वेदांतमधे झालेला पालट

श्री. आनंद पाटील

२ अ. मनमिळाऊ : त्याची वृत्ती मनमिळाऊ आहे. तो त्याच्यासाठी दिलेला खाऊ आपल्या सर्व मित्रांना देऊन वाटून खातो.

२ आ. ऐकण्याची वृत्ती वाढणे : घरात वारकरी संप्रदायानुसार चाललेल्या हरिपाठात तो आवर्जून सहभाग घेतो. त्याचा ऐकण्याचा भाग वाढला आहे. त्याला खाणाखुणा करून सांगावे लागत नाही.

२ इ. चांगली आकलन शक्ती : वर्ष २०१७ या वर्षी तो आमच्यापासून दूर त्याच्या आजोळी सोलापूर येथे होता. मूकबधिर शाळेत त्याची नावनोंदणी केली होती. त्याच्या शिक्षकांच्या म्हणण्यानुसार त्याची आकलन शक्ती छान आहे. तो सांगितलेले समजून घेतो.

२ ई. चांगली स्मरणशक्ती : या वर्षी त्याच्या स्मरणशक्तीत वाढ झाली आहे. त्याच्या बोलण्यात सुधारणा जाणवत आहे. त्याला डहाणू (जि. पालघर) येथील मूकबधिर शाळेत घातले आहे. त्याला नात्यांची जाण आहे.

२ उ. देवाशी अनुसंधान : सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितले, ‘‘त्याचे देवाशी अनुसंधान असते.’’

२ ऊ. त्याच्या तोंडवळ्यावरील तेज वाढल्यासारखे जाणवते.

२ ए. सुस्पष्ट बोलणे : शाळेला सुट्टी लागल्यापासून तो घरी आहे. त्याच्या ऐकण्यात आणि बोलण्यात सुस्पष्टता जाणवत आहे. मी नामजपादी उपाय करायला बसलो की, तो माझ्याकडून कापूर आणि अत्तर मागून घेऊन उपाय करतो.

२ ऐ. चुकांप्रती गांभीर्य असणे : कुणी त्याची चूक लक्षात आणून दिली, तर तो लगेच चूक स्वीकारतो आणि कान पकडून क्षमा मागतो.

२ ओ. संतांप्रती आदरभाव : सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकरताई आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची छायाचित्रे दाखवली की, तो नमस्कार करतो आणि ‘त्यांची भेट कुठे झाली’, ते सांगतो.

३. स्वभावदोष

त्याचा हट्टीपणा वाढला आहे. तो मस्ती करतो, मनासारखे झाले नाही, तर चिडतो.

‘हे श्रीकृष्णा, त्याच्या ऐकण्या-बोलण्यात सुधारणा होऊ दे आणि तो या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !’

– श्री. आनंद पाटील (कु. वेदांतचे वडील), बोईसर, पालघर.  (१.६.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता