उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. पूर्वा प्रशांत लिंगायत ही या पिढीतील एक आहे !
चि. पूर्वाचे आई-वडील आणि पनवेल येथील साधिका यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. जन्म ते ६ मास
अ. ‘चि. पूर्वा उपजतच शांत आहे.
आ. ती ४ मासांची असतांना तिला ‘विठूचा गजर हरिनामाचा’ हे भक्तीगीत ऐकवले की, ती हात आणि पाय हालवून प्रतिसाद देत असे. तिला ‘कृष्णबाप्पा कुठे आहे ?’, असे विचारल्यावर ती घरातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात असे.
२. ७ मास ते १ वर्ष
२ अ. पशू-पक्ष्यांवर प्रेम करणे : आमच्या घराच्या आगाशीत नेहमी एक चिमणी येत असे. पूर्वा त्या चिमणीला नेहमी तांदूळ देत असे. गाय, मोर आणि चिमणी, अशा प्रकारचे प्राणी किंवा पक्षी पाहिल्यावर तिला पुष्कळ आनंद होतो. एकदा आमच्या घराच्या आगाशीत एक कावळा आला होता. तेव्हा पूर्वाने त्याला देण्यासाठी माझ्याकडून बिस्किट मागून घेतले आणि आगाशीच्या खिडकीवर नेऊन ठेवले. पूर्वा त्या कावळ्याशी बोलत होती. तेव्हा ‘तिला कावळ्याची भाषा समजत आहे’, असे मला वाटले.
२ आ. उत्तम आकलनक्षमता : आम्ही घरामध्ये भ्रमणभाषवर सतत ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावून ठेवतो. तो नामजप ऐकून पूर्वा नामजप म्हणण्याचा प्रयत्न करते.
२ इ. देवाची ओढ
१. पूर्वाला देवतांची चित्रे अचूक ओळखता येतात. सनातनच्या पंचांगातील देवतांची चित्रे पाहून ती त्या देवतांची नावे सांगते.
२. तिला कोणत्याही देवतेचे चित्र दिले की, ती ते चित्र डोक्याजवळ नेऊन नमस्कार करते.
३. ती मारुतिस्तोत्र, श्रीकृष्ण आणि सद्गुरु यांचे श्लोक बोबड्या बोलांमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करते.
२ ई. प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रती भाव : आम्ही देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर पूर्वाला तेथील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पहाण्यास पुष्कळ आवडते. वर्ष २०२५ मध्ये गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ झाला. त्या वेळी पूर्वा आमच्या समवेत गोव्याला आली होती. तेव्हा ती तेथे असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेकडे सारखी धाव घेत होती.
२ उ. संत आणि गुरु यांच्याप्रती भाव : आम्ही रात्री झोपतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पूर्वाजवळ ठेवतो. तेव्हा ती त्या ग्रंथावर डोके ठेवून नमस्कार करते आणि नंतर झोपते. या ग्रंथातील श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या छायाचित्रांकडे पाहून तिला आनंद होतो.
३. १ ते २ वर्षे ८ मास
३ अ. व्यवस्थितपणा : पूर्वा बाहेरून घरात येतांना तिच्या चपला काढून मांडणीत ठेवते. ती कुठेही बाहेर गेली की, स्वतःच्या चपला व्यवस्थित ठेवते आणि बाजूला कुणी चपला अव्यवस्थित ठेवल्या असतील, तर ती त्या चपला व्यवस्थित ठेवते.’
३ आ. स्वभावदोष : चिडचिडेपणा’
– सौ. वर्षा लिंगायत आणि श्री. प्रशांत लिंगायत (पूर्वाचे आई-वडील ), नवीन पनवेल, रायगड.
३ इ. व्यवस्थितपणा : ‘एकदा मी पूर्वाच्या घरी गेले होते. तेव्हा तिने चॉकलेट खाऊन चॉकलेटचा कागद केराच्या बालदीत नेऊन टाकला. मी तिचे कौतुक केल्यावर तिची आई म्हणाली, ‘‘पूर्वा नेहमीच काही खाऊ खाल्ल्यावर त्याचे वेस्टन स्वतःहून केराच्या बालदीत टाकते.’’
३ ई. मंदिरात जाण्याची आवड : माझे यजमान डॉ. भरत बुगडे यांचे सुकापूर, पनवेल येथे अय्यपा मंदिराजवळ चिकित्सालय आहे. एकदा पूर्वाची आई पूर्वाला घेऊन चिकित्सालयात आली होती. तेव्हा तिने पूर्वाला चिकित्सालयाच्या समोर असलेल्या अय्यप्पा मंदिरात आरतीसाठी नेले होते. तेव्हापासून ती आमच्या चिकित्सालयात आल्यावर त्या मंदिरात जाण्याचा हट्ट करते.
३ उ. नामजपाची आवड : मी एकदा पूर्वाच्या आईला भ्रमणभाष केला. तेव्हा ती आणि पूर्वा रिक्शामधून प्रवास करत होत्या. आम्ही बोलत असतांना पूर्वा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप वेगवेगळ्या लयीत म्हणत होती. तेव्हा ‘ती करत असलेला नामजप ऐकतच रहावा’, असे मला वाटले. तिच्या आवाजातील नामजप ऐकून मला उत्साह जाणवला.’
– सौ. मांडवी बुगडे, नवीन पनवेल, रायगड. (९.७.२०२६)
प्रेमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा वर्धा येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीरंग नीरज क्षीरसागर (वय १२ वर्षे) !
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
दैवी बालिकांच्या उपस्थितीत झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनमोल सत्संगातील क्षणमोती !
विविध कलांची आवड असणारी आणि आईला सेवेत साहाय्य करणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची भोसरी (पुणे) येथील कु. साची कुलकर्णी (वय १५ वर्षे) !
देवाची ओढ असलेली ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची नागपूर येथील चि. सुमिरा सचिन सहारे (वय ४ वर्षे) !
सात्त्विकतेची ओढ असणारा ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बारामती (जिल्हा पुणे) येथील चि. श्रीहरि वैभव कुंभार (वय १ वर्षे ९ मास) !