उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रीकृष्ण उरकुडे हा या पिढीतील एक आहे !

१. श्री. नामदेव उरकुडे (कु. श्रीकृष्णाचे वडील), राजुरा, जिल्हा चंद्रपूर.
१ अ. काटकसरीपणा : ‘कु. श्रीकृष्ण आवश्यक तेवढेच कपडे विकत घेतो. ‘गुरुधन विनाकारण व्यय करायचे नाही’, असा त्याचा विचार असतो.

१ आ. तो लहान-मोठ्यांशी नम्रपणे बोलतो.
१ इ. प्रेमभाव : श्रीकृष्ण त्याच्या आजी-आजोबांना (आईच्या आई-वडिलांना) प्रतिदिन भ्रमणभाष करून त्यांची विचारपूस करतो.
१ ई. घरकामांत साहाय्य करणे : तो आईला घरकामांत साहाय्य करतो. आता श्रीकृष्ण आणि त्याची मोठी बहीण (कु. अवंती) शिक्षणासाठी बाहेरगावी रहातात. तिथे तो बहिणीला घरकामांत साहाय्य करतो.
१ उ. आता तो त्याच्या बहिणीकडून स्वयंपाक शिकत आहे.
१ ऊ. श्रीकृष्णाला खाणे-पिणे आणि कपडे यांविषयी आवड-नावड नाही.
१ ए. त्याच्या मनाविरुद्ध काही घडले, तरी तो चिडचिड न करता शांत रहातो.
१ ऐ. चुकांविषयीची संवेदनशीलता : श्रीकृष्णाकडून एखादी चूक झाली, तर तो प्रांजळपणाने ती चूक सांगतो. श्रीकृष्णाला त्याचे स्वभावदोष लक्षात आणून दिले, तर तो लगेच ते स्वीकारतो आणि स्वभावदोष घालवण्यासाठी प्रयत्न करतो.
१ ओ. तो त्याला सांगितलेली सेवा लगेच स्वीकारतो आणि करतो.

‘वर्ष २०२५ मध्ये ‘कु. श्रीकृष्ण नामदेव उरकुडे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२६ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५८ टक्के झाली आहे. ‘त्याच्यावर पालकांनी केलेले याेग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव’, यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२२.७.२०२६)
१ औ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच श्रीकृष्ण आणि श्रीराम आहेत’, असा कु. श्रीकृष्णाचा भाव असतो.
२. तो श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्याशी सूक्ष्मातून बोलतो.
३. देवघरात पूजा आणि आरती करतांना ‘गुरुमाऊलीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्याकडून सर्व करून घेत आहेत’, असा त्याचा भाव असतो.
४. तो बाहेर जात असतांना आम्ही त्याला ‘सांभाळून जा’, असे म्हणतो. तेव्हा तो म्हणतो, ‘‘गुरुमाऊली माझ्या समवेत आहेत. तुम्ही काळजी करू नका.’’
१ अं. जाणवलेले पालट
१. श्रीकृष्णाचे साधनेचे गांभीर्य वाढले आहे. तो प्रतिदिन नामजप आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत सारणी लिखाण पूर्ण करतो.
२. पूर्वी श्रीकृष्ण एकटा बाहेर जात नसे. आता तो त्याची शैक्षणिक किंवा शासकीय कामे एकटाच करतो.’
२. सौ. मंगला दर्वे, चंद्रपूर
अ. ‘श्रीकृष्ण मनमिळाऊ आहे.
आ. तो मोठ्या व्यक्तींचा आदर करतो.
इ. त्याला सांगितलेली सेवा तो वेळेत करण्याचा प्रयत्न करतो. तो इतर साधकांना सेवेत साहाय्य करतो.’
३. स्वभावदोष
आळशीपणा, अव्यवस्थितपणा आणि सतर्कतेचा अभाव
‘हे गुरुमाऊली, ‘आमच्या पोटी या दैवी बालकाचा जन्म झाला’, त्याबद्दल आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. नामदेव उरकुडे (कु. श्रीकृष्णाचे वडील), राजुरा, जिल्हा चंद्रपूर.
(सर्व सूत्रांचा दिनांक : २३.६.२०२६)
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
देवाची ओढ असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची नवीन पनवेल येथील चि. पूर्वा प्रशांत लिंगायत (वय २ वर्षे ८ मास) !
प्रेमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा वर्धा येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीरंग नीरज क्षीरसागर (वय १२ वर्षे) !
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
दैवी बालिकांच्या उपस्थितीत झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनमोल सत्संगातील क्षणमोती !
विविध कलांची आवड असणारी आणि आईला सेवेत साहाय्य करणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची भोसरी (पुणे) येथील कु. साची कुलकर्णी (वय १५ वर्षे) !