काही जणांना खंत वाटते की त्यांची समाधी लागत नाही. त्यांनी हे लक्षात घ्यावे की समाधीमधून व्युत्थान होऊन, म्हणजे पुन्हा जागृत अवस्थेत येऊन, संसार-व्यवहार मागे लागतो. पण अज्ञानी व्यक्तीचे अज्ञान नष्ट होऊन आत्मज्ञान झाल्यावर पुन्हा कधीही त्यातून व्युत्थान म्हणजे पुन्हा अज्ञानात जाणे, होत नाही.
– अनंत आठवले (२५.१०.२०२०)
(संदर्भ : ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून)
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
(लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक)