मिसिसागा (कॅनडा) येथे सामाजिक कार्यक्रम आयोजित करणार्‍या हिंदु कुटुंबाला अज्ञात मुलांकडून मारहाण

ज्यू नागरिकांप्रमाणे जगभरात हिंदूंचा वचक निर्माण करण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

मिसिसागा (कॅनडा) – कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्ट्रीट्सविले पार्कमध्ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्याची पत्नी आणि २ मुले यांना मारहाण केली. मारहाणीपासून वाचण्यासाठी चारचाकी गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर या मुलांनी हिंदूंच्या गाडीवर दगडफेक केली. यात घायाळ झाल्याने हिंदु व्यक्तीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.