गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशभक्तांसाठी श्री गणेशाचा नामजप उपलब्ध
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनीमुद्रित केलेली नामजप म्हणण्याची योग्य पद्धत !
‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून विविध नामजप महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ध्वनीमुद्रित केले आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ हे तारक स्वरूपातील नामजप ध्वनीमुद्रित केले असून ते सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
१. नामजप म्हणण्याची गती
मनुष्याच्या प्रकृतीप्रमाणे त्याची जप म्हणण्याची गती असते. श्री गणेशाचे वरील दोन्ही नामजप मध्यम गतीचे आहेत. ज्यांना जलद गतीने म्हणायचे आहेत, त्यांनी जप म्हणण्याच्या पद्धतीने जप जलद गतीत म्हणावेत; पण जप म्हणण्याची पद्धत मात्र पालटू नये. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग !’, असा साधनेचा सिद्धांत असल्याने ज्या गतीने नामजप केल्यावर तुमचा भाव अधिक प्रमाणात जागृत होतो, त्या गतीने नामजप करावा.
२. दोन नामजपांमधील अंतर
‘एका नामजपानंतर तोच नामजप ऐकण्यापूर्वी मध्ये किती अंतर असावे ?’, याविषयी मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘व्यक्तीच्या प्रकृतीनुसार दोन जपांमधील अंतर अधिक-उणे होऊ शकते. त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे हा नामजप म्हणतांना हे अंतर आपण पालटू शकतो.’ या नामजपात सर्वसाधारण अंतर ठेवण्यात आले आहे.
सनातन संस्थेमध्ये अशा प्रकारे सूक्ष्माकडे नेणारा अभ्यास करायला शिकवले जाते. त्यामुळेच अन्य संप्रदायांच्या तुलनेत सनातनच्या साधकांची प्रगती जलद गतीने होते.
हे नामजप सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.
- हे नामजप संकेतस्थळावर पुढील लिंकवर उपलब्ध आहेत : https://www.sanatan.org/mr/a/492.html
- ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करून नामजप ऐका : https://www.sanatan.org/Chaitanyavani
| श्री गणेशाचे दोन्ही नामजप ऐकून काय जाणवते ? याचा अभ्यास करा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास त्या आम्हाला [email protected] या ई-मेल पत्त्यावर अवश्य कळवा. |
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
कोथरूड (पुणे) येथे ‘अमळनेरकर महाराज सेवा संघा’च्या वतीने भव्य ‘नऊकुंडी दत्तयाग’ आणि ‘वायनदान’ पूर्णाहुतीने सोहळा पार पडला !
सनातन संस्थेची आपत्काळासाठी ग्रंथसंपदा !
Declare SavarkarSadan National Memorial : शासनाने ‘सावरकर सदन’ संपादन करून ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे !