श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ काही दिवस बाहेरगावी असतांना ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रियांका राजहंस यांनी रामनाथी आश्रमातील साधकांच्या साधनेचे दायित्व घेतले होते. आश्रमात आल्यावर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ प्रियांकाताईचे कौतुक करत असून जणू त्यांनीच ही कविता केली आहे’, अशा आशयाचे त्यातील शब्द आहेत.
माझी प्रियांका, माझी प्रियांका ।
घेते साधकांच्या साधनेचे दायित्व ।
आहे तुझ्यात प्रेमभाव अन् इतरांचा विचार ।
तत्त्वनिष्ठ राहून सांगतेस तू साधकांच्या चुका ।
परिपूर्ण सेवेची तळमळ असे तुझ्या ठायी ।
म्हणूनच कृष्ण म्हणतो, ‘आमची प्रियांकाताई’ ।। २ ।।
दायित्व घेऊनी संपादन करतेस ईश्वराचा विश्वास ।
‘रामनाथी आश्रम आनंदी रहावा’, हाच तुझा ध्यास ।। ३ ।।
गुरूंचे बोट पकडूनी, मनी कृष्णाला वसवूनी ।
जाशील अध्यात्मात तू पुढे पुढे ।
संतत्वाकडे वाटचाल करूनी आदर्श होशील हिंदु राष्ट्रात ।। ४ ।।
या सर्व गुणांमुळे सर्वांना तू हवीहवीशी वाटते ।
माझ्या प्रियांकाला कुशीत घेऊन ।
मी एकच म्हणेन, ‘माझी प्रियांका, माझी प्रियांका’ ।। ५ ।।
मी आतापर्यंत एकही कविता केली नव्हती. केवळ गुरुमाऊलींच्या कृपेमुळे मला ही कविता स्फुरली.’
– कु. सानिका जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०२०)