काबुल – येथील विमानतळाबाहेर गुरुवारी सायंकाळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. विमानतळाच्या ‘अॅबे गेट’वर हा स्फोट झाला असून तेथे सहस्रो अफगाणी नागरिक विदेशात जाण्यासाठी विमानतळावर जाण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे अफगाणी नागरिक मोठ्या प्रमाणात ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठार झालेल्यांमध्ये विदेशी नागरिक नसल्याचे वृत्त आहे. बॉम्बस्फोटाच्या काही घंटे आधीच स्फोट करणार असल्याचे जिहादी संघटना इस्लामिक स्टेटकडून सांगण्यात आले होते.
Explosion outside Kabul airport, Pentagon spokesman confirms; number of casualties is unclear https://t.co/SVVx8HneDt
— The Washington Post (@washingtonpost) August 26, 2021