
कोल्हापूर, २४ ऑगस्ट (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेले संशयित गणेश मिस्कीन हे सध्या भायखळा येथील ‘सेंट्रल जेल’ (ऑर्थर रोड कारागृह) येथे असून त्यांना डाव्या पायात ‘वेरिकोज व्हेन’मुळे प्रचंड त्रास होत आहे. ‘वेरिकोज व्हेन’साठी विशेष उपचारांची आवश्यकता असते. त्यासाठी पुढील उपचारांसाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात भरती होणे आवश्यक असतांना मिस्कीन यांना वारंवार कारागृहातील वैद्यकीय अधिकार्यांकडेच उपचारांसाठी पाठवण्यात येत आहे. तरी गणेश मिस्कीन यांनी ‘वेरिकोज व्हेन’साठी जे.जे. रुग्णालयात पुढील उपचार मिळावेत, असे आदेश न्यायालयाने द्यावेत, असे आवेदन गणेश मिस्कीन यांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्याकडे २४ ऑगस्ट या दिवशी सादर केले आहे. यावर पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार आहे.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !