माझ्या मुलीला अफगाणिस्तानमधून सोडवा !

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या इसिसच्या महिला आतंकवाद्याच्या आईची भारत सरकारला विनंती

धर्मांध हिंदु मुलींचे धर्मांतर करून त्यांच्याशी लग्न करतात आणि नंतर त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी वापर करून घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अशा ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करणे आवश्यक आहे ! – संपादक

(डावीकडे) बिंदू संपत, (उजवीकडे) निमिशा फातिमा

नवी देहली – ‘इसिस’मध्ये भरती होण्यासाठी केरळमधून पळून गेलेली एक महिला अफगाणिस्तानमध्ये अडकली आहे. त्यामुळे तिला परत आणावे, तसेच तिच्यावर भारतीय कायद्यानुसार खटला चालवण्यात यावा, अशी विनंती तिच्या आईने भारत सरकारकडे केली आहे.

वर्ष २०१७ मध्ये निमिशा फातिमा नावाची महिला केरळमधून बेपत्ता झाली होती. कालांतराने ती इसिसमध्ये भरती झाल्याचे समोर आले होते. वर्ष २०१९ मध्ये तिने अफगाण सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे ती अफगाणिस्तानच्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत होती; परंतु आता तालिबान्यांनी काबूल कह्यात घेतल्यानंतर शेकडो कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. सध्या तिच्याविषयी कोणतीही माहिती नाही. त्यामुळे तिला परत आणावे, अशी विनंती तिची आई बिंदू संपत यांनी भारत सरकारकडे केली आहे.

निमिशा इसिसमध्ये भरती होण्यामागे ‘लव्ह जिहाद’ ?

संपत म्हणाल्या, ‘‘थिरूवनंतपुरम् येथील निमिशाच्या शिकवणी केंद्रामध्ये एका डॉक्टरने आणि आतंकवाद्यांनी तिला इसिसमध्ये भरती होण्यासाठी भाग पाडले. निमिशाचा पती इसिस तळावरील अमेरिकेच्या हवाई आक्रमणात मारला गेला होता. इसिसच्या ४०० जणांनी अफगाण सैन्यासमोर आत्पसमर्पण केले होते. तेव्हापासून निमिशा आणि तिची ४ वर्षांची मुलगी अफगाणिस्तानच्या कारागृहामध्ये आहेत.’’