भावी आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी साधकांचे खरे रक्षणकर्ते असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रक्षाबंधनानिमित्त प्रार्थनारूपी राखी

कु. सर्वमंगला मेदी यांनी भावपूर्ण सिद्ध केलेली राखी

१. श्रीकृष्णासम साधकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना आनंदी ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१ अ. गोकुळवासियांमध्ये स्वकर्तृत्वाचा अहं निर्माण झाल्यावर श्रीकृष्णाने त्याचे निर्मूलन करणे आणि त्यांच्या मनातील संकटाचे भय दूर करून त्यांना आनंद देणे : द्वापरयुगात गोकुळवासियांमध्ये ‘आपण गोवर्धन पर्वताला काठ्या लावल्यामुळे कृष्णाला गोवर्धन पर्वत उचलणे शक्य झाले’, असा अहं निर्माण झाला. तेव्हा कृष्णाने पर्वताखाली धरलेली आपली करंगळी थोडीशी काढली. त्या वेळी गोकुळवासियांच्या काठ्या आणि त्यांसह त्यांचा अहं मोडून पडला. ते ‘कृष्णा, कृष्णा’, असा धावा करू लागले. तेव्हा कृष्णाने पुन्हा आपल्या करंगळीने गोवर्धन पर्वत तोलून धरला आणि मधुर मुरली वाजवून त्यांच्या मनातील पावसाच्या संकटाची भीतीही नष्ट केली अन् त्यांना आनंद दिला.

१ आ. गुरुदेवांनी साधकांकडून स्वभावदोष-निर्मूलनाची प्रक्रिया राबवून घेणे आणि कोरोनाच्या आपत्काळात त्यांना सतत सत्मध्ये रहायला शिकवून आनंदात ठेवणे : कोरोना महामारीच्या संकटकाळात समाजातील लोक भयाच्या सावटाखाली दिवस कंठत आहेत. ‘कोरोनाचे भय, अन्नाची टंचाई, औषधांच्या अभावाने होणारे मृत्यू, कुटुंबात कलह वाढणे’, यांमुळे लोक दुःखात बुडाले आहेत; परंतु सनातनचे साधक ‘ऑनलाईन’ सत्संग, भाववृद्धी सत्संग, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, शिबिरे’ यांमध्ये व्यस्त आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना संकटांच्या भीतीची जाणीव होऊ न देता आनंदात ठेवले आहे.

१. कोरोना महामारीमुळे लागू झालेल्या दळणवळण बंदीमुळे घरातील सदस्यांना अधिक काळ एकत्र रहावे लागले. तेव्हा अनेक कुटुंबांमधील कलह वाढले. न्यायालयातील घटस्फोटांची प्रकरणे वाढली. या उलट सनातन संस्था घेत असलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगांमुळे सनातनच्या साधकांच्या घराघरांतील वातावरण सनातनच्या आश्रमांप्रमाणे सात्त्विक झाले.

२. घरी भ्रमणभाषवरून सत्संग ऐकायला लागल्याने साधकांचे कुटुंबीयही साधना करू लागले. त्यामुळे कुटुंबियांचे साधकांना साधनेसाठी साहाय्य करण्याचे प्रमाणही वाढले.

३. नामजप-सत्संगामुळे गल्लीतील सर्व घरांमधील लोक एकाच वेळी नामजप करू लागले.

साधकांना कोरोना महामारीच्या कालावधीत आलेल्या अनुभूतींचे स्मरण केले, तरी ‘प.पू. गुरुदेव भवसागर निश्चित पार करून देतील’, याची निश्चिती वाटते; म्हणून ‘गुरुदेव, तुम्हीच साक्षात् नारायण आहात’, असे मला वाटते.

२. साधिकेने गुरुदेवांना रक्षाबंधनानिमित्त प्रार्थनारूपी राखी अर्पण करणे

‘हे भक्तवत्सल, तुमची कृपा आम्हा सर्वांवर अखंड असू द्या. आमचे गुरु, देव, बंधू, नातेवाईक, पती आणि माता-पिता सर्व तुम्हीच आहात गुरुदेव ! तुम्हीच आमचे खरे रक्षक आहात. पुढे येणार्‍या तीव्र आपत्काळात आम्हा सर्व साधकांच्या रक्षणासाठी तुमच्या श्री चरणकमली प्रार्थनारूपाने ही राखी अर्पण करते गुरुदेव ! तिचा स्वीकारा करावा.

‘साधना, भक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ज्ञान’, हे सर्व आम्हाला देऊन तुम्हीच आमची आध्यात्मिक प्रगती करवून घेणार आहात. ‘त्यासाठी तुम्हीच आम्हाला पात्र बनवा आणि आम्हाला सामर्थ्य द्या’, ही प्रार्थना !

सनातन संस्थेच्या गुरुपरंपरेत आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे गुरु आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासारख्या त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी लाभल्या आहेत. दोन्ही सद्गुरुद्वयी परात्पर गुरुदेवांशी एकरूप झाल्या आहेत. ‘ते तिघे बाहेरून वेगवेगळे दिसत असले, तरी तत्त्वरूपाने एकच आहेत’, याची अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे.

‘सनातनच्या सर्व साधकांच्या हृदयमंदिरात तिन्ही गुरुमातांचे (परात्पर गुरुदेव (गुरुमाऊली), श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदामाऊली (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे) अस्तित्व शाश्वत राहू द्या. सर्व साधकांची निवासस्थाने तुमचे आश्रम होऊ देत’, अशी तुमच्या चरणकमली प्रार्थना !

वरील प्रार्थना करत असतांना मला पुढील काही ओळी काव्यरूपात सुचल्या. त्या तुमच्या चरणी अर्पण करते. गुरुदेवा, त्यांचा स्वीकार करावा.

– कु. सर्वमंगला बसवराज मेदी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०२१)

रक्षाबंधनानिमित्त
भावपूर्ण प्रार्थना !

आमची साधना वाढू दे ।
अशी शिष्य म्हणून तुमच्या चरणी प्रार्थना ।। १ ।।

आमची भक्ती वाढू दे ।
अशी भक्त म्हणून देवाला प्रार्थना ।। २ ।।

आमचे ज्ञान वाढू दे ।
अशी सखा म्हणून
कृष्णाला प्रार्थना ।। ३ ।।

माझ्या या राखीचा
स्वीकार करावा ।
अशी बहीण म्हणून
भावाला प्रार्थना ।। ४ ।।

– कु. सर्वमंगला बसवराज मेदी (१६.८.२०२१)