उत्तर भारतातील युवा साधकांकडून ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रसार

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ

नवी देहली – १५ ऑगस्टच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतासाठी एका ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजस्थान येथील कु. वंशिका राठी, देहली येथील कु. सिमरन सचदेवा, नोएडा येथील श्री. निखिल गुप्ता, श्री. अनुराग यादव, चंडीगड येथील चिन्मयी खन्ना, तर मथुरा येथील अक्षिता वार्ष्णेय या युवा साधकांनी या कार्यक्रमाविषयीची ‘पोस्ट’ (लिखाण) त्यांच्या मित्रांना पाठवून कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या सर्व युवा साधकांनी कार्यक्रमाची ‘पोस्ट’ एकूण १०८ जणांना  पाठवली.