
सातारा, १४ ऑगस्ट (वार्ता.) – वाई तालुक्यात २ वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून २ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची नोंद वाई पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. आसरे येथील संतोष कांबळे ९ ते १२ ऑगस्ट या कालावधीत तांबडेवाडी नावाच्या शिवारामध्ये सार्वजनिक विहिरीमध्ये पडल्यामुळे बुडून मृत्यूमुखी पडले, तर सारिका नेताजी फडतरे या कपडे धुण्यासाठी १२ ऑगस्ट या दिवशी बोपर्डी येथील ओढ्यावर गेल्या होत्या. कपडे धुऊन झाल्यानंतर केस धुण्यासाठी ओढ्यामध्ये उतरल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. याविषयी त्यांचे पती शंकर नेताजी फडतरे यांनी पोलिसांना माहिती दिली.
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखाना कोसळला; २ कामगार घायाळ