प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवणार्‍या चिराला (आंध्रप्रदेश) येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आंडाळ आरवल्ली (वय ८४ वर्षे) !

१. चिराला (आंध्रप्रदेश) येथील ‘श्रीमती आंडाळआजी मितभाषी आहेत. त्या अनावश्यक बोलत नाहीत.

श्रीमती आंडाळ आरवल्ली

२. आवड-निवड नसणे

आजींची खाण्याविषयी कोणतीही आवड-निवड नाही, तसेच त्यांना कसलीही आसक्ती नाही. त्या ‘केवळ स्वतःचे आरोग्य चांगले रहावे’; म्हणून जेवतात.

३. परिस्थिती स्वीकारणे

सौ. मीना कदम

अ. आजींच्या मुलाला एकदा रुग्णालयामध्ये भरती केले होते. त्या वेळी त्यांना ८ दिवस दुसर्‍या नातेवाइकांकडे रहावे लागले. त्या वेळी त्यांनी ही परिस्थिती सहजतेने स्वीकारली.

आ. त्यांच्या नवीन घराची ‘गृहप्रवेश पूजा’ होईपर्यंत पुष्कळ उशीर झाला. त्या दिवशी त्यांनी सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते, तरीही त्या कोणतेही गार्‍हाणे न करता पाहुण्यांशी बोलत होत्या.

४. आजी कुणाविषयी नकारात्मक बोलत नाहीत आणि परिस्थितीलाही दूषणे देत नाहीत.

५. आजी प्रतिदिन ४ घंटे बसून नामजप पूर्ण करतात आणि त्यानंतरच घरातील कामे करतात.

६. स्थिरता

श्री. चेतन गाडी

आजींच्या मोठ्या बहिणीचे निधन झाल्यावर त्या स्थिर होत्या. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘आपल्याला केवळ भगवंताशी नाते जोडायचे आहे. या संसाराशी नाही.’’

७. ‘केवळ भगवंतच प्रत्येक समस्येवर उपाय काढू शकतो’, अशी श्रद्धा असणे

त्यांच्या घरात आर्थिक अडचणी आहेत. त्यांची ‘केवळ भगवंतच प्रत्येक समस्येवर उपाय काढू शकतो’, अशी श्रद्धा आहे. एका कठीण प्रसंगात त्यांनी स्थिर राहून निर्णय घेतला. घरात कोणतीही समस्या आली, तर तिच्यावर उपाय म्हणून आजी प्रथम नामजप करतात.

८. आजींमध्ये झालेले दैवी पालट

अ. आजींचा तोंडवळा पूर्वीपेक्षा अधिक चमकदार दिसतो.

आ. आजींच्या वयोमानानुसार त्यांच्या डोक्यावरील केस पांढरे झाले होते. आता ते काळ्या रंगाचे होत आहेत आणि त्यांचे काही केस सोनेरी रंगाचे झाले आहेत.’

– सौ. मीना कदम (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), विशाखापट्टणम् आणि श्री. चेतन गाडी, भाग्यनगर

(१७.७.२०२०)