पंजाबमध्ये अज्ञातांकडून मंदिराची तोडफोड !

भवानीगड (पंजाब) – येथील घनवडा गावामधील नीलकंठ महादेव मंदिराची आणि त्यामधील भगवान शिव अन् हनुमान यांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. तसेच येथील देवतांची चित्रे जाळण्यात आली. राज्यात गेल्या मासाभरात अशा प्रकारची घटना घडण्याची ही दुसरी वेळ आहे. (पंजाबमध्ये हिंदूंच्या मंदिरांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येऊन तेथे धार्मिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘यामागे खलिस्तानवादी आहेत का ?’ याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे – संपादक )

या घटनेची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या विरोधात येथे निदर्शनेही केली. त्यानंतर गावातील सरपंचाने ‘मंदिर पुन्हा बांधण्यात येईल’, असे आश्वासन दिले. १० जुलैच्या दिवशी पंजाबच्याच मलेरकोटला जिल्ह्यातील सरौद गावामध्येही एका शिवमंदिरात तोडफोड करण्यात आली होती.