२ कोटी रुपयांच्या व्ययाची मान्यता
पुणे, २३ जुलै – जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युद्धकलेचे शिक्षण घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या दोघांना मानवंदना देण्यासाठी महापालिकेच्या वतीने त्यांचे शिल्प शिवनेरी किल्ल्यावर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी रुपयांचा व्यय करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.