नालासोपारा येथे छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍याला चोप !

मुंबई – पालघर जिल्ह्यातील नालासोपारा (पूर्व) येथील विजयनगरमधील ‘हिल २’ सोसायटीच्या व्हॉट्सअप गटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या युवकाला सकल मराठा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न करून चोप दिला, तसेच पोलिसांच्या स्वाधीन केले. अक्षदीप भरतकुमार विसावाडिया असे वादग्रस्त लिखाण करणार्‍या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी येथील तुळीज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस याविषयी अधिक अन्वेषण करत आहेत.