Summons To Ullu App : उल्लू ॲपचे विशेष कार्यकारी अधिकारी विभू अग्रवाल आणि अभिनेते एजाज खान यांना समन्स !

  • अश्लील सामग्री प्रसारित केल्याचे प्रकरण

  • ९ मे या दिवशी राष्ट्रीय महिला आयोगासमोर उपस्थित रहावे लागणार !

मुंबई – उल्लू ॲपचे विशेष कार्यकारी अधिकारी विभू अग्रवाल आणि अभिनेते एजाज खान यांना मुंबई पोलिसांनी समन्स पाठवला आहे. दोघांनाही अन्वेषण यंत्रणेसमोर उपस्थित राहून त्यांचे म्हणणे सादर करावे लागणार आहे. त्यांच्यावर ‘हाऊस अरेस्ट’ या वादग्रस्त कार्यक्रमात अश्लील सामग्री प्रसारित केल्याचा आरोप आहे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या समन्सप्रकरणी ९ मे या दिवशी विभू अग्रवाल आणि एजाज खान यांना राष्ट्रीय महिला आयोगासमोर उपस्थित रहावे लागणार आहे.