गांधीनगर (गुजरात) – सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेनभाई पटेल यांना निमंत्रण देण्यात आले. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी सनातन संस्थेचे श्री.चंद्रशेखर कद्रेकर यांनी नुकतीच श्री. भूपेनभाई पटेल यांची भेट घेतली.
Gujarat CM Bhupendrabhai Patel invited to the Sanatan Rashtra Shankhnaad Mahotsav in Ponda, Goa (May 17–19)! 🙏
Celebrating 25 yrs of @SanatanSanstha & the 83rd Birth Anniversary of Sachchidananda Parabrahman (Dr.) Jayant Athavale.
✊ Let’s unite for Sanatan resurgence! 🚩… pic.twitter.com/pGWvAoNV02
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 6, 2025
१७ ते १९ मे या कालावधीत फोंडा, गोवा येथील फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात हा महोत्सव साजरा होणार आहे. या वेळी श्री. भूपेनभाई पटेल यांनी महोत्सवाची संपूर्ण निमंत्रणपत्रिका वाचली आणि ‘मी या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचा अवश्य प्रयत्न करीन’, असे आश्वासन दिले. या वेळी श्री. दिघंत शहा, श्री. भरत गोहिल, श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे आणि श्री. देवेन पाटील हेही उपस्थित होते.
यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनाही या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे.